बातम्या

महाराष्ट्रात गेल्या आठ महिन्यात 21 हजार 968 अपघात!

सकाळ न्यूज नेटवर्क

जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात राज्यातील विविध महामार्गांवर तब्बल 21 हजार 968 अपघात झाले आहेत. त्यामध्ये आठ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांमध्ये 19,164 जण गंभीर जखमी झाले असून सहा हजार 862 जण किरकोळ जखमी झाल्याची नोंद महामार्ग पोलिसांकडे आहे.

राज्यात दिवसेंदिवस अपघातप्रवण ठिकाणांची संख्या वाढत आहे. महामार्गांवर पडलेले खड्डे, वाहनचालकांमधील बेशिस्त, वाहनांचा वाढलेला वेग, वाहतूक नियमांची पायमल्ली आणि संबंधित शासकीय विभागांकडून होणारे दुर्लक्ष ही कारणे अपघातासाठी जबाबदार असल्याचे दिसून येते. महामार्गांवर हेल्मेट सक्‍ती असूनही बहुतांशी दुचाकीस्वारांकडे ते दिसून येत नाही. तसेच वाहतूक नियम अपघात रोखण्यासाठीच असतात, याची जाणीव आता वाहनचालकांमध्ये नसल्याचेही स्पष्ट होते. अपघात रोखण्यासाठी वाहलचालकांनी स्वत:हून शिस्त लावून घेणे हाच उत्तम उपाय आहे. 

महामार्गांवरील वाहतूक सुरळीत व्हावी, वाहनचालकांना शिस्त लागावी, कायद्याचे पालन करावे यासाठी आरटीओ विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. परंतु, अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ही चिंतेची बाब आहे. कारवाईने अपघात थांबणार नाहीत तर त्यासाठी वाहनचालकांमध्ये स्वंय जागृतीची गरज आहे. मागील आठ महिन्यात सोलापूरात तब्बल साडेतीनशे वाहनचालकांचे परवाने निलंबित केले आहेत. - संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 

यंदाच्या अपघातांची स्थिती 
जानेवारी ते ऑगस्ट 
एकूण अपघात - 21968 
गंभीर जखमी - 19164 
किरकोळ जखमी- 6862 
मृत्यू - 8039

Web Title: 22 thusand accidents in eight months

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT