positive rate
positive rate 
बातम्या

दिलासादायक! महाराष्ट्राचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 6.37 टक्क्यांवर

वृत्तसंस्था

महाराष्ट्रात मागच्या काही दिवसात कोरोनाची (Coronavirus) आकडेवारी कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात (Maharashtra) रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. परंतु, आता रुग्णसंख्या 15 हजाराच्या आसपास आली आहे. महाराष्ट्रातील अनलॉकबद्दल आज निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्रासाठी आणखी एक जमेची बाब म्हणजे महाराष्ट्राचा पॉझिटिव्हिटी रेट 6.37 टक्क्यावरती आला आहे. (Maharashtra's corona positivity rate at 6.37 percent)

मागच्या 24 तासात राज्यात  15,229 रुग्ण आढळले आहेत.  त्याचबरोबर, 25,617 रुग्णांनी कोरोनावरती मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 57,91,413 रुग्ण आढळले असून 54,86,206 रुग्णांनी कोरोनावरती यशस्वी मात केली आहे. मागच्या 24 तासात राज्यात 307 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत देशात  97,394 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 2,04,974 अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. 3,57,74,626 नागरिकांची आतापर्यंत कोरोनाची चाचणी करण्यात आलेली आहे.

हे देखील पाहा

दरम्यान, ज्या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्के आहे त्या जिल्यात मात्र कडक निर्बंध असणार आहेत. पॉझिटिव्हिटी रेटनुसार अनलॉक केले जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. परंतु, अनलॉकबद्दलची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे.

Edited By : Pravin Dhamale 

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे गेल्या १० वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? ; कोकणातून राज ठाकरेंची तोफ धडाधडली

साडीत खुललं Sonalee Kulkarni चं मनमोहक सौंदर्य; पाहा अप्सरेचे Photos

Amit Shah: रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने पराभूत होतील, अमित शाह यांचं भाकीत

Jammu Kashmir: काश्मीरमध्ये हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला

Prakash Ambedkar On Pm Modi | नरेंद्र मोदींना मौत का सौदार बोलणे योग्यच आंबेडकरांचं कॉंग्रेसशी एकमत

SCROLL FOR NEXT