पुणे : कोरोना Corona काळात लोककलावंतांची प्रचंड आर्थिक हेळसांड होत आहे. विविध लोककलावंत गेल्या दोन वर्षांपासून व लॉकडाऊन Lockdown सुरू झाल्यापासून प्रचंड आर्थिक Economical Crisis संकटात आहेत. या कठीण काळात कलावंताच जगणं अवघड झाले आहे. दोन वेळच्या अन्नाची देखील मारामार होऊ लागली आहे. त्यामुळे शासनाने आम्हा लोक कलावंताकडे लक्ष द्यावे, आणि आम्हाला आर्थिक मदत Financial Aid मिळवून द्यावी अशी मागणी Demand लोक कलावंत प्रदीप कांबळे Pradeep Kamble यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray, उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्याकडे केली आहे. Lockdown Has Made Life Difficult, Sir; Please Help
लोकगीतकार प्रदीप कांबळे हे महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. त्यांचे 'सुया घे पोत घे' गाणे महाराष्ट्राने डोक्यावर घेतले होते व चांगला प्रतिसाद देखील महाराष्ट्रातील रसिकांनी दिला होता. त्यांची अनेक लोकगीते महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. गेल्या दीड वर्षांपासून काम नसल्याने उपासमार सुरू झाली आणि त्यात कोरोनाने घेरलं आता जगायचं कसं असा प्रश्न त्यांनी आर्तपणे सरकारला विचारला आहे.
प्रदीप कांबळे हे गेल्या तीन मे पासून कात्रज येथील एका कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असून रुग्णालयाचे आतापर्यंतचे बिल दीड लाखाच्या आसपास झाले आहे. त्यामुळे हे भरण्यासाठी आम्ही पैसे आणायचे कुठून बिल भरण्यासाठी साहेब आम्हाला आमची कमावलेली पुंजी म्हणजे दागिने आणि अंगठी विकून या हॉस्पिटलचे बिल भरावे लागणार आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यातील हजारो लोक कलावंत बेरोजगार झाले आहेत. Lockdown Has Made Life Difficult, Sir; Please Help
या लोककलावंतानी कुटुंब चालवायचे कसे? आमच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या यात्रा, जत्रा, लग्न समारंभ सगळे कोरोनाच्या काळात बंद झाले आहेत. त्यामुळे लोककलावंताला जगणे अवघड झाले आहे. यापेक्षा 'मेलेलं बरं,आम्हाला वाली कोण' सरकारी मदत कधीच लोककलावंतला मिळत नाही अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली आहे.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला मदत करावी, अशी मागणी प्रदीप कांबळे यांनी केली आहे. Lockdown Has Made Life Difficult, Sir; Please Help
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.