बातम्या

एलआयसी’ भरती परीक्षेत हिंदीची सक्ती

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : 'एलआयसी'तर्फे सहाय्यक पदासाठी भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याच्या जाहिराती वेबसाइटवर उपलब्ध आहेत. देशभरातील या भरतीमध्ये महाराष्ट्रात २१६ पदांची भरती होणार आहे. भरतीसाठी पूर्व आणि मुख्य परीक्षा होणार आहे. पूर्व परीक्षा १०० गुणांची असून, यात इंग्रजी किंवा हिंदी भाषेचे कौशल्य ४०, अंकक्षमता ३५, कारणक्षमता ३५ अशी गुण विभागणी करण्यात आली आहे. ही विभागणी देशभरात समान आहे. यातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा २०० गुणांची होणार असून, याची विभागणी दक्षिण, पूर्व, ईशान्य भारत वगळता पाच भागांत करण्यात आली आहे. यातील पाचवा भाग हा हिंदी भाषेचा असून, पश्चिम क्षेत्रातील म्हणजे महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात येथील उमेदवारांना ४० गुणांची हिंदीची परीक्षा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा सक्तीची आहे. 'एलआयसी'ने परीक्षा घेताना हा भेदभाव का केला आहे, असा प्रश्न इच्छुक उमेदवार विचार आहेत.

मुख्य परीक्षेचे गुणनिहाय स्वरूप

विषय दक्षिण, पूर्व, ईशान्य भारत महाराष्ट्र व उर्वरित भारत

सामान्य वित्त ज्ञान ५० ४०

सामान्य इंग्रजी ४० ४०

अॅप्टिट्युट ५० ४०

कारण क्षमता व

संगणकीय क्षमता ६० ४०

हिंदी भाषा लागू नाही ४०

एकूण २०० २००
 
एलआयसी ऑफ इंडिया'ने नुकतीच देशभरात साडेसात हजारांहून अधिक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती करताना घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हिंदीची सक्ती करण्यात आली आहे. दक्षिण, पूर्व आणि ईशान्य भारतातील मात्र उमेदवारांना अशी सक्ती नसल्याने राज्यातील इच्छुक उमेदवारांनी याबद्दल नाराजी व्यक्त करत ही अट रद्द करण्याची मागणी केली आहे.


'एलआयसी'ने मुख्य परीक्षा देशभरात पहिल्या चार निकषांवरच घ्यावी. त्यात भाषेची सक्ती करू नये. जर करावयाचीच असेल तर तेथे स्थानिक भाषेची परीक्षा घ्यावी, अशी मागणी हे उमेदवार करत आहेत. यासंदर्भात 'एलआयसी'च्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. दरम्यान, 'एलआयसी'च्या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेचे किमान ज्ञान असणे आवश्यक आहे, असे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे हिंदीची परीक्षा घेण्यात काहीच अर्थ नाही, असा युक्तिवाद हे उमेदवार करत आहेत.


Web Title :lic recruitment 2019 hindi compulsory in lic assistant exam


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah: रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने पराभूत होतील, अमित शाह यांचं भाकीत

Today's Marathi News Live : उध्दव ठाकरे यांच्या धाराशिव येथील सभेला मोठी गर्दी

Jammu Kashmir: काश्मीरमध्ये हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला

Prakash Ambedkar On Pm Modi | नरेंद्र मोदींना मौत का सौदार बोलणे योग्यच आंबेडकरांचं कॉंग्रेसशी एकमत

Bajarang Sonawane Viral Video | Beed येथे मराठा आंदोलकांनी बजरंग सोनवणे यांची गाडी अडवली! काय घडलं?

SCROLL FOR NEXT