pakistaan train Accident.jpg
pakistaan train Accident.jpg 
बातम्या

पाकिस्तानात दोन रेल्वेच्या अपघातात 30 जणांचा मृत्यू (पहा व्हिडिओ)

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था : पाकिस्तानातील Pakistan सिंध प्रांतातील Sindh Prant  धारकी Dharaki शहराजवळ दोन एक्सप्रेसची धडक झाल्यामुळे मोठा अपघात Accident  झाला आहे. आज (7 जून) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिल्लत एक्सप्रेस Millat Express आणि  सर सय्यद  एक्सप्रेसची Sir Syed Express  धडक झाल्यामुळे मिलत एक्स्प्रेसच्या आठ आणि सर सय्यद एक्स्प्रेसचे चार डबे रुळावरून घसरले. मिल्लत एक्स्प्रेस कराचीहून सरगोधा व सय्यद एक्सप्रेस रावळपिंडीहून कराचीकडे जात असताना धारकी शहाराजवळ हा अपघात झाला.  (At least 30  people have been killed in two train accidents in Pakistan) 

स्थानिक अधिकारी रझाक मिन्हास यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, सिंध प्रांतातील घोटाकी जिल्ह्यातील धारकी शहाराजवळ हा अपघात झाला. अपघातामुळे दोन्ही गाड्यांचे 13 ते 14 डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात 32 प्रवासी ठार झाल्याची तर 50 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर  या अपघातात झालेल्या जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर  घोटाकी, धारकी, ओबेरो आणि मीरपूर मॅथेलो या रुग्णालयांमध्ये आपत्कालीन स्थिती घोषित करून सर्व डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचार्‍यांना कर्तव्यावर बोलवण्यात आले आहे. तर घटनास्थळीदेखील  बचाव पथके आणि मेडिकल कॅम्प तैनात करण्यात आले आहेत. 

तर बचवकार्य चालू असून दोन्ही गाड्यांमध्ये अद्यापही अनेक प्रवासी अडकले आहेत. तर अपघातामुळे बंद झालेले रस्ते पुन्हा सुरळीत करण्यासाठी निमलष्करी दल आणि उपकरणे दाखल झाले आहेत.  याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री आझम स्वाती यांना त्यांनी तातडीने घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. तसेच घटनेच्या  सर्वंकष  चौकशीचे आदेशही दिले आहेत. त्याचबरोबर आपघतातील जखमीना मदत देण्यासह सांगण्यात आले आहे. 

Edited By- Anuradha Dhawade 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT