Last date for uploading assessment marks under CBSE 12th is 28th June
Last date for uploading assessment marks under CBSE 12th is 28th June 
बातम्या

CBSE 12th Exam: 28 जूनपर्यंत करा मूल्यांकनाचे गुण अपलोड

वृत्तसंस्था

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाइन घेण्याची परवानगी दिली आहे. तसेच या प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण 28 जून पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अपलोड करण्याची मुदतही वाढविण्यात आली आहे. बोर्डाने मूल्यांकनाचे गुण आपलोड करण्याची अंतिम तारीख 28 जूनपर्यंत वाढवली आहे. ज्या शाळांनी आतपर्यंत प्रॅक्टिकल आणि अंतर्गत मूल्यांकन केलेल नाही त्यांनाच केवळ ऑनलाइन पद्धतीने मूल्यांकन करण्यास बोर्डाने मान्यता दिली आहे. (Last date for uploading assessment marks under CBSE 12th is 28th June)

सीबीएसई 12 वी बोर्डाचे निकाल जाहीर करण्यासाठी आधीच एक 13 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीला 10 दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करायचा आहे.

 ही देखील पहा - 

त्यानंतर बारावीच्या निकालांचे मूल्यांकन घोषित केले जाईल. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच 12 वीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जे विद्यार्थी मूल्यमापनाच्या निकषांवर समाधानी नाहीत त्यांच्यासाठी दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे मंडळाचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी सांगितले आहे. 

सीबीएसईने 15 जुलै ते 26 ऑगस्ट दरम्यान 12 वी बोर्डाची परीक्षा घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सीबीएसईच्या प्रस्तावानुसार सप्टेंबरमध्ये निकाल जाहीर होईल. यासह मंडळाने दोन पर्यायही दिले आहेत.

यामध्ये अधिसूचित केंद्रांपैकी एकामध्ये 19 प्रमुख विषयांसाठी नियमित परीक्षा आयोजित करण्यात यावी, तर दूसरा पर्याय असा की, विद्यार्थी ज्या शाळेत शिकतात, त्याच शाळांमध्ये अल्प-मुदतीसाठी परीक्षा घेण्यात यावी. असे दोन पर्याय बोर्डाच्यावतीने विद्यार्थ्याना देण्यात आले आहेत. 

Edited By- Puja Bonkile 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Health Tips: उन्हाळ्यात माठातील पाणी का प्यावे?

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

SCROLL FOR NEXT