corona machine
corona machine 
बातम्या

जामखेडला दिले कोरोना विषाणू निष्क्रिय करण्याचे 'यंत्र'

साम टीव्ही,

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला (Corona Third Wave In India) सामोरे जाण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा विविध उपाय योजना राबवत आहेत. त्यात अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातील (Jamkhed) रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर या संस्थेने प्रशासनाला मदतीचा हात देत एक अनोखा उपक्रम राबवला आहे. कोरोनाविषाणू (Coronavirus) निष्क्रिय करणारे युरेका फॉर्बस कंपनीचे "कोरोणागार्ड" हे यंत्र या संस्थेने प्रशासकीय कार्यालयांना भेट दिले आहेत.

जामखेड आणि कर्जत तालुक्यातील तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन, लसीकरण केंद्र अशा सरकारी कार्यालयांमध्ये हे यंत्र बसवण्यात आले आहे. या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे या यंत्राच्या 1000 स्क्वेअर फुट परिसरातील कोरणाचे विषाणू निष्क्रिय करण्याचे काम हे यंत्र करते.(Jamkhed has got 'machines' to deactivate the corona virus)

हे देखील पाहा

कोरोनावर मात करण्यासाठी एक छोटीशी मदत म्हणून या रत्नदीप फाउंडेशनने पुढाकार घेत सरकारी कार्यालयांना हे यंत्र भेट म्हणून दिले आहे. अशा प्रकारचे यंत्र हे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये बसवण्यात यावे असे मत प्रशासकीय अधिकारी करत आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये गर्दीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात प्रथमच सरकारी कार्यालयांमध्ये हे कोरोनागार्ड यंत्र बसवून कोरोनावर मात करण्याचा छोटासा प्रयत्न या रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर या संस्थाने केला आहे.

Edited By : Pravin Dhamale
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 7 मे ला नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Skin Care Tips: रात्रभर चेहऱ्यावर ऑलिव्ह ऑईल लावा; पिंपल्सच्या समस्या होतील दूर

Pankaja Munde: मी इथेच पाहिजे..; पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली मनातील इच्छा

Explainer : ठाण्यात नरेश म्हस्केंना उमेदवारी, दुसऱ्या दिवशी भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; CM शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?

Chandrahar Patil : पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभेत पराभव कोणी केला?; चंद्रहार पाटील यांनी केला गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT