बातम्या

बीडची गृहमंत्री मीच- पंकजा मुंडे

सकाळ न्यूज नेटवर्क

बीड : गृहमंत्री असताना मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील गॅंगवॉर संपवले होते. तसे, बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गॅंगवार आपण संपविले आहे. त्यामुळे बीडची गृहमंत्री कोणी दुसरे कोणी नसून मीच आहे असा असा हल्लाबोल ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी केला. दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त गोपीनाथगडावर त्यांनी अभिवादन केले. यानंतर दोन दिवसीय आरोग्य शिबीर आणि विविध शासकीय उपक्रमांच्या लाभार्थींना योजना वाटपाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडें बोलत होत्या.

मुंडे साहेबांनी आयुष्यात अनेक आघात सहन केले. पण, आपल्या माणसांकडून झालेल्या आघाताने त्यांच्या मनाला खूप वेदना झाल्या. अनेकांना त्यांनी घडवले, दुःखावर फुंकर घातली, पण कधी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही. सध्या काही जण एकीकडे त्यांचा वारसा सांगतात आणि नाव मात्र दुसऱ्याचे घेतात असा दुटप्पी पणा फार काळ चालणार नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. 

"माझे नुकसान करताना इतरांच्या दहा चुली बंद करण्याचे पाप करू नका, समोरुन वार करा, हारले तर सन्मानाने हार स्विकारेल आणि जिंकले तर तुमचा सन्मान वाढवेल," असा घाणाघातही त्यांनी केला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आम्हा तीनही मुलींवर चांगले संस्कार केले, खंबीरपणे वाढवले, त्यांनी आम्हाला हिंमत तर दिलीच पण त्याचबरोबर दयाळूपणाही शिकवला. गोपीनाथ गडावर बोललेला शब्द खरा ठरतो त्यामुळे देशात पुन्हा 'कमळ'च फुलणार आहे, "असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

याप्रसंगी मंत्री राम शिंदे, महादेव जानकर, खासदार डॉ. प्रितम मुंडे, दादा इदाते, आमदार आर. टी. देशमुख, आमदार संगीता ठोंबरे, आमदार सुरेश धस, आमदार सुधाकर भालेराव, आमदार मोहन फड, आमदार मोनिका राजळे, आमदार पवार, गोविंदराव केंद्रे उपस्थित होते.

Web Title: I am Beed districts Home Minister says Pankaja Munde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

SCROLL FOR NEXT