बातम्या

महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या दाम्पात्यांमध्ये वाद, पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या

सकाळ न्यूज नेटवर्क

सातारा : महाबळेश्वर येथे फिरायला आलेल्या दाम्पत्यांमध्ये वाद झाल्यानंतर पतीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. महाबळेश्वर येथे फिरायला आलेल्या अनिल सुभाष शिंदे (वय 34) याने पत्नी सिमा अनिल शिंदे (वय 30) हिला धारदार शस्त्राने गळा चिरून तिचा खून केला व स्वतःने भोसकून घेऊन आत्महत्या केली. हा सर्व प्रकार 11 वर्षांच्या मुलगा आदित्य अनिल शिंदे (वय 11) याचे समोर घडला. हे दांपत्य धानोरी, विश्रांतवाडी, पुणे येथील असल्याचे समजते. रात्री उशिरा झालेल्या या प्रकाराने हॉटेल मालकाने त्वरीत पोलिसांना व १०८ ला फोन केला, परंतू उशीर झाला होता.

महाबळेश्वर येथिल एका लॉजमध्ये अनिल सुभाष शिंदे (वय ३४) वडार सोसा. ऑफिसजवळ (धानोरी रोड, विश्रांतवाडी पुणे) हे पत्नी सिमा शिंदे सोबत आपल्या दहा वर्षांच्या मुलासोबत महाबळेश्वर येथे पर्यटनास आले होते. सायंकाळी आपल्या रूममध्ये परतले. मात्र, बुधवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास लॉजिंग मालकास रूम मधून आवाज आल्याने ते रूमच्या दिशेने गेले. रूम आतून बंद होती लहान मुलाने ही रूम उघडली. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दोघांचे मृतदेह दिसले.

लॉजच्या मालकाने तात्काळ पोलिस प्रशासन व १०८ रुग्णालयाला फोन करुन दोघानांही महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयामध्ये नेले. मात्र, उपचारांआधीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी फॉरेन्सिक व ठसे तज्ज्ञ व स्थानिक सहा. पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

Web Title: husband killed wife in Mahabaleshwar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : वर्ध्यातील वादळात मुळासकट संत्राची झाडे जमीनदोस्त

Salman Khan House Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या

Health Tips: उशीच्या कव्हरमुळे होतात त्वचेसंबंधीत आजार; किती दिवसांनी बदलावे कव्हर?

Special Report : कॉलर उडवण्यावरून Udayanraje Bhosale आणि Sharad Pawar यांच्यात राजकीय जुगलबंदी

Special Report : महायुतीसाठी मनसे घेणार 'राज'सभा

SCROLL FOR NEXT