बातम्या

अंबानींची संपत्ती एका वर्षात किती पटीन वाढली ? 

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : एकीकडे अंबानी यांची संपत्ती वाढत असताना अॅमेझॉनचे बॉस जेफ बेझॉस यांच्या संपत्तीत १३.२ अब्ज डॉलरची घट झाली. बेझॉस यांनी वर्षभरात ९२ हजार ४०० कोटी गमावले. तेल आणि वायू क्षेत्रातील दबदबा असलेल्या अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने दूरसंचार, किरकोळ व्यापाराकडे मोर्चा वळवला आहे. मागील दोन वर्षात 'रिलायन जिओ'ने दूरसंचार सेवेत मोठी मुसंडी मारली आहे. वर्षभरात रिलायन्सच्या शेअरमधील वृद्धी ही शेअर निर्देशांकांच्या तुलनेत सरस ठरली आहे. गुंतवणूकदार रिलायन्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.

मागील वर्षभरात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर तब्बल ४० टक्क्यांनी वधारला. अंबानी यांची एकूण संपत्ती चार लाख कोटींच्या पुढे गेली आहे. अब्जाधीश अंबानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असून त्यांची संपत्ती ६१ अब्ज डॉलर अर्थात ४ लाख २७ हजार कोटी आहे.
मंदी आणि भांडवली बाजारातील अनिश्चिततेने जगभरातील उद्योजकांना हैराण केले असताना 'रिलायन्स इंडस्ट्रीज'चे मुकेश अंबानी मात्र अपवाद ठरले आहेत. मागील वर्षभरात अंबानी यांच्या संपत्तीत थोडी थोडकी नव्हे तर तब्बल १ लाख १९ हजार कोटींची (१७ अब्ज डॉलर) भर पडली आहे. अंबानी यांची संपत्ती वाढीत रिलायन्सच्या शेअरने सिंहाचा वाट उचलला आहे. 

 दूरसंचार सेवेमधील बड्या कंपन्यांना तोटा झाला असताना जिओने मात्र दुसऱ्या तिमाहीत ९९० कोटींचा नफा मिळाला. गतवर्षाच्या तुलनेत जिओच्या नफ्यात ४५ टक्के वाढ झाली.भविष्यात दूरसंचार आणि रिटेल व्यवसाय रिलायन्स समूहाला फायदेशीर ठरतील, असा अंदाज आहे. त्यादृष्टीने खुद्द अंबानी यांनी बिझनेस स्ट्रॅटेजी बदलली आहे. अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे तेल आणि नैसर्गिक वायू उद्योगातील अवलंबित्व कमी करून त्याऐवजी दूरसंचार आणि रिटेल तसेच ई-कॉमर्स व्यवसायावर लक्ष केंद्रीत करण्याचा रोडमॅप आखला आहे. जिओचे देशभरात जवळपास ३५ कोटी ग्राहक आहेत.

WebTittle:; How many puttin's of Ambani's wealth increased in one year?


 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: भिवंडी तालुक्यातील प्लास्टीक कंपनी ला भीषण आग

Chennai Shocking Video: दुसऱ्या मजल्याच्या छतावर अडकले बाळ... पाहणाऱ्यांचाही श्वास अडकला; रेस्क्यूचा VIDEO व्हायरल

Sharad Pawar: मोदी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत, हे पाहिल्यानंतर चिंता वाटते: शरद पवार

RCB Vs GT : विल जॅक्सचं ४१ चेंडूत तुफानी शतक; बेंगळुरूचा गुजरातवर रेकॉर्डब्रेक विजय

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांनी मला राजकारणात आणले, शिवसेना नेते तानाजी सावंत यांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT