बातम्या

 वाशी स्थानकात लोकल विस्कळीत, लोकलच्या पेंटाग्राफला आग

सकाळ न्यूज नेटवर्क


नवी मुंबई: वाशी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील एका गाडीच्या पेंटाग्राफमध्ये अचानक बिघाड झाला. पेंटाग्राफनं पेट घेतला आणि बघता-बघता सगळीकडं धूर पसरला. त्यामुळं एकच गोंधळ उडाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्रांच्या मदतीनं तात्काळ हालचाल करून आग नियंत्रणात आणली. त्यानंतर ही गाडी कारशेडकडे रवाना करण्यात आली. मात्र, तोपर्यंत हार्बर मार्गावरील अनेक गाड्या रखडल्या होत्या. आता वाहतूक सुरू झाली असली तरी ती पूर्ववत व्हायला काही वेळ लागणार आहे. सध्या या मार्गावरील गाड्या २० ते २५ मिनिटे उशिरानं धावत आहेत.
 हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात एका लोकल गाडीच्या पेंटाग्राफला आग लागल्यानं या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अज्ञात व्यक्तीनं पेंटाग्राफवर ट्रॉली बॅग फेकल्यामुळं ही आग लागल्याचं आता समोर आलं आहे. या घटनेत कुणीही जखमी झालं नाही. मात्र, ऐन कार्यालयीन वेळेतच हा प्रकार घडल्यानं चाकरमान्यांचा चांगलाच खोळंबा झाला.

ही बॅग नेमकी कुणी आणि का फेकली, याचा शोध रेल्वे पोलीस घेत आहेत. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही तपासण्याचं काम सुरू आहे. याआधीही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कुणीतरी कमरेचा बेल्ट ओव्हरहेड वायरवर फेकल्यानं वायर तुटून लोकलचा खोळंबा झाला होता. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी रेल्वे मार्गांलगत गस्त घालणं सुरू केलं आहे. तरीही या घटना समोर येत असल्यानं लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Web Title harbour local disrupted due to technical fault in pantograph at vashi railway station
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Gochar 2024: १० मे नंतर 'या' तीन राशींना होणार धनलाभ; बुध देव करणार करोडपती होण्याचा आशीर्वाद

Britney Spears : हॉटेलच्या बाहेर नको त्या अवस्थेत बाहेर पडली पॉप सिंगर; सोशल मीडिया ढवळून निघालं, ती म्हणतेय, हे सर्व खोटं आहे!

Pandharpur Vitthal Mandir : विठुरायाचे पदस्पर्श दर्शन लांबणीवर; विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन- संवर्धनाचे काम रखडले

MNS Leader Avinash Jadhav: सराफ व्यापाऱ्याकडे ५ कोटी मागितले? मनसे नेते अविनाश जाधवांनी आराेप फेटाळले

Rahul Gandhi News: पराभवाची भिती की रणनिती? राहुल गांधींनी अमेठी मतदार संघ का सोडला? वाचा काँग्रेसच्या खेळीची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT