बातम्या

गुगलवर सनी लिओनीपेक्षा 'ही' ठरली सरस

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये गुगल सर्चमध्ये पहिल्या स्थानावर आबाधित असलेल्या अभिनेत्री सनी लिओनीला यंदा विंक गर्ल प्रिया वारियर हिने मागे टाकले आहे. विशेष म्हणजे सनी लिओनी पहिल्या दहामध्येही नाही. 2018 मध्ये मोस्ट सर्च पर्सनॅलिटीजमध्ये प्रिया पहिल्या स्थानावर असून, प्रियांका चोप्राचा पती निक जोन्स दुसऱ्या स्थानावर आहे.

जगातील आघाडीचे सर्च इंजिन असणारे 'गुगल' जगभरातील कोट्यवधी नेटिझन्सना रोज मार्गदर्शन करत असते, त्यामुळे 'गुगल'च्या खात्यात दरवर्षी अब्जावधी सर्च जमा होतात. या सर्चवर "गुगल'चे बारीक लक्ष असते, दरवर्षी न चुकता वर्षाच्या अखेरीस "गुगल'कडून जगभरातील विविध देशांतील लोकांनी 365 दिवसांमध्ये नेमके काय सर्च केले याचा ताळेबंद मांडला जातो. यंदाही 'गुगल'ने भारतीयांच्या सर्चिंग ट्रेंड्‌सचा लेखाजोखा मांडला आहे. 

यंदाच्या गुगल ट्रेडिंग लिस्टमध्ये क्रीडा, राजकारण, माध्यमे आणि मनोरंजन अशा विविध विषयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यंदाही या सर्चिंग लिस्टमध्ये मनोरंजनपर विषयच आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

गुगलवर भारतात सर्वाधिक सर्च करण्यात आलेले व्यक्ती -
1) प्रिया वारियर
2) निक जोन्स
3) सपना चौधरी
4) प्रियांका चोप्रा
5) आनंद अहुजा
6) सारा अली खान
7) सलमान खान
8) मेघन मार्केल
9) अनुप जलोटा
10) बोनी कपूर

भारतातून यासाठी सर्चिंग 
फिफा विश्‍वविश्वकरंडक 2018 
लाइव्ह स्कोअर 
आयपीएल 2018 
कर्नाटक निवडणूक निकाल 
बाल वीर 
बिग बॉस 
रोबोट 2.0 
आशियाई करंडक 2018 
मोटू पतलू 
आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 

गुगलकडून "हाऊ टू'ची सर्च लिस्ट जारी करण्यात आली असून, यामध्ये नेटिझन्सनी प्रामुख्याने पुढील प्रश्‍न विचारलेले दिसतात. 
व्हॉट्‌सऍपवर स्टिकर्स कशी पाठवावीत 
मोबाईल क्रमांकास आधार कसा लिंक करावा 
रांगोळी कशी काढावी 
मोबाईल सेवा पुरवठादार कंपनी कशी बदलावी 
बिटकॉईनमध्ये गुंतवणूक कशी करावी 
आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज कसा करावा 
चेहऱ्यावरून होळीचे रंग कसे काढावेत 
इयत्ता दहावीचा 2018 साठीचा निकाल कसा पाहावा 
रूबिक क्‍यूबचे कोडे कसे सोडवावे 
आसामच्या एनआरसीमधील नाव कसे तपासावे 

Web Title: Priya Varrier Beats Sunny Leone In Google Search

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchayat 3 Released Date : अखेर ठरलं..., 'पंचायत ३' याच महिन्यात रिलीज होणार; कहाणीत कोणता नवा ट्वीस्ट येणार ?

Today's Marathi News Live : राणे-तटकरेंचा पराभव करण्यासाठी ठाकरे पितापुत्र कोकणात

Raju Patil News : आम्ही सतत पाठिंबा द्यायला बसलेलो नाही, राजू पाटील यांचा महायुतीला इशारा?

Summer Skin Care: या घरगुती उपायांनी होईल काळी त्वचा गोरी

Heat Wave in Maharashtra : मे महिना 'ताप'दायक ठरणार, राज्यात उष्णतेची लाट येणार

SCROLL FOR NEXT