बातम्या

डबेवाल्यांना तातडीने घरे मिळावित : अजित पवार 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबईच्या डबेवाल्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हक्काची घरे उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, तसेच त्यांच्या मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्नही तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिले. 

मुंबईतील डबेवाल्यांकरिता घरबांधणी, मुंबई डबेवाला भवन तसेच अन्य मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, अपर मुख्य सचिव संजय कुमार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी उपस्थित होते. 

अजित पवार म्हणाले, ‘‘मुंबईतील डबेवाल्यांच्या कौशल्याचे जगभरात कौतुक होते. त्यांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार गेल्या वर्षांपासून प्रयत्नशील आहे. त्यासाठी योग्य ती कार्यवाही तातडीने सुरू करावी.’’

डबेवाल्यांचे कौशल्य जाणून घेण्यासाठी जगभरातील पर्यटक, अभ्यासक येत असतात. डबेवाल्यांना त्यांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी हक्काची जागा असावी. त्यासाठी मुंबई डबेवाला भवनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

 तसेच डबेवाल्यांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी या वेळी दिले. या वेळी मुंबई डबेवाला संघटनेचे पदाधिकारी किरण गवांदे, रामदास करवंदे, रितेश आंद्रे आदी उपस्थित होते.

WebTittle :: get emergency homes: Ajit Pawar


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Commuters Falls From Train : लोकलगर्दीचे बळी! ५ दिवसांत ३ प्रवाशांचा ट्रेनमधून पडून मृत्यू

Nashik News: हृदयद्रावक! खेळता खेळता तलावात पडले, बहिण भावाचा करुण अंत; नाशिक हळहळलं

Navi Mumbai News : अतिरिक्त फी न भरल्याने दीड हजार विद्यार्थ्यांचे निकाल थांबवले; संतप्त पालकांनी गाठले पोलीस ठाणे

Marriage Invitation Card: लग्न पत्रिका बनवताना घ्या ही विशेष काळजी, अन्यथा...

Sanjay Raut: वाढलेला आकडा आला कुठून? मतदानाच्या टक्केवारीवरून संजय राऊतांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT