ICMR
ICMR 
बातम्या

आता घरीच करा कोरोना टेस्टिंग ICMR चे होम किट काय आहे जाणून घ्या... 

राजू सोनावणे, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : आता कोरोना Corona चाचणीसाठी Testing काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण आपण घरी  Home स्वतःची चाचणी Testing करु शकतो. होम बेस्ड टेस्टिंग किटला आयसीएमआरने मान्यताही दिली आहे.Find Out What Is Home Kit of Corona Testing By ICMR

आयसीएमआरने ICMR मंजूर केलेले किट म्हणजे रॅपिड अँटीजेन टेस्टिंग RAT किट आहे. या किटच्या KIT माध्यमातून लोक घरी बसल्या त्यांच्या नाकातील स्वेब नमुने घेऊन कोरोनाची चाचणी करू शकतात.

हे देखील पहा -

सध्या होम टेस्टिंग हे फक्त लक्षण असलेल्या रुग्णांसाठीच आहे, त्या व्यतिरिक्त जे कोरोना रुग्णाच्या थेट संपर्कात आले आहेत. ते देखील रॅपिड अँटीजेन टेस्टिंग किट चाचणी किट वापरु शकतात. Find Out What Is Home Kit of Corona Testing By ICMR

काय आहे प्रक्रिया : 

यासाठी सर्वप्रथम आपल्याला 'होम टेस्टिंग मोबाइल अ‍ॅप' HOME TESTING MOBILE APP  हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅप्पल स्टोअर वरून डाऊनलोड करावे लागेल. या अ‍ॅपद्वारे आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटीव्ह दोनीही अहवाल प्राप्त करता येतील.

जे होम टेस्टिंग करतात त्यांना टेस्ट स्ट्रिप पिक्चर घ्यावा लागेल आणि त्याच फोनवरून फोटो घ्यावा ज्यावर मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड केला जाईल. मोबाइल फोनचा डेटा आयसीएमआरच्या चाचणी पोर्टलवर थेट स्टोअर केला जाईल. ज्यांचा पॉझिटिव्ह अहवाल या चाचणीद्वारे येईल त्यांना कोरोना चाचणी पॉझिटिव्ह मानली जाईल. Find Out What Is Home Kit of Corona Testing By ICMR

हे नियम पाळणे आवश्यक आहे 

जे रुग्ण  पॉझिटिव्ह असतील त्यांना होम आयसोलेशन संदर्भात आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना पाळाव्या लागतील. निगेटिव्ह रिपोर्ट आल्यास अशा रुग्णांना आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. तथापि, या काळात लोकांची ओळख सार्वजनिक केली जाणार नाही.

सर्व रॅपिड अँटीजेन निगेटिव्ह लोकांना संशयित कोविड केस मानले जाईल आणि आरटीपीसीआर रिजल्ट येईपर्यंत त्यांना होम आयसोलेशनमध्येच रहावे लागेल.Find Out What Is Home Kit of Corona Testing By ICMR

माय लॅब डिस्कव्हरी सोल्यूशन लिमिटेड पुणे  कंपनीला होम आयसोलेशन टेस्टिंग किटसाठी अधिकृत केले गेले आहे. या किटचे नाव COVISELF (पॅथोकेच) आहे या किट च्या माध्यमातून  नेजल स्वैब घ्यावे लागेल. 

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : ...तर आम्ही मदत केली असती; हिना गावित यांच्या भेटनंतरही शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांची नाराजी कायम

धडाधड त्यांचे उमेदवार पाडा, राजू शेट्टींचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन, Video

Today's Marathi News Live : शरद पवारांचे कट्टर समर्थक पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील भाजपच्या वाटेवर

Fastest Fifty in 2024 : १५ चेंडूंतच ठोकलं अर्धशतक, फ्रेजर मॅक्गर्कनं स्वतःचाच रेकॉर्ड मोडला, बुमराहलाही सोडलं नाही!

Potato Wafers Recipe : वर्षभर खराब न होणारे बटाटा वेफर्स रेसिपी

SCROLL FOR NEXT