Saam Banner Template 
बातम्या

सध्याची परिस्थिती अजून वर्ष- दोन वर्षे राहणार; काळजी घ्या - गृहमंत्री वळसे पाटील

वैदेही काणेकर आणि अमोल कविटकर

आंबेगाव: कोरोना गेलेला नाही. हीच परिस्थितीत अजून वर्ष- दोन वर्षे राहणार आहे. त्यामुळे काळजी घेतली गेली पाहिजे. गर्दी टाळली पाहिजे,लग्न, यात्रा जत्रा,सार्वजनीक ठिकाणी गर्दी कमी केली पाहिजे. कोरोनाबाबत गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी चिंत्ता व्यक्त केली आहे.  पुढील भविष्याचा विचार करुन पुण्याच्या ग्रामीण भागासाठी जम्बो कोव्हिडं सेंटर उभारल आहे. जम्बो म्हटलं की पुण्या मुंबईत उभारलेले मोठे डोंम दिसतात मात्र इथे वेगळं सेंटर उभारल आहे यासाठी उपलब्ध असलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजचा वापर यासाठी केला गेला आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था कितीही मोठी असली तरी कोरोना मूळे आरोग्य व्यवस्था मात्र अपुरी पडत आहे अशी चिंता व्यक्त करत आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.  असे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. (Corona will stay another year two years Take care  Home Minister Walse Patil)

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आज 
राज्याच्या ग्रामीण भागातील सर्वात मोठ्या जम्बो कोविड केअर हॉस्पिटचा लोकार्पण सोहळा आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या जम्बो कोविड हॉस्पिटलचे नामकरण शिवनेरी जम्बो कोविड हॉस्पिटल करण्यात आले आहे. यावेळी जुन्नरचे आमदार अतुल बेनके, खेडचे आमदार दिलीप मोहिते, शिरुरचे आमदार अशोक पवार, जिल्ह्याधिकारी डॉ राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख. आदि मान्यवर उपस्थिती होते.

हे देखील पाहा

यावेळी गृहमंत्री म्हणाले पुढे म्हणाले  की, राज्यात आघाडी ही सरकारमध्ये असुन याचा अर्थ कॉग्रेस, शिवसेना,राष्ट्रवादी कॉग्रेस यांना आपआपली ताकत वाढविण्यासाठी कुठलाही प्रतीबंध नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपआपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, आणि निवडणूका साडेतीन वर्ष पुढे असतानाच सध्या स्वबळाची भाषा वापरण्याची गरज नसल्याचे मत गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना टोला लगावला. राज्यात सध्या कोरोनाचे संकट असताना आघाडी व निवडणुकी संदर्भात भाष्य करणं योग्य नाही आता कोरोना महामारी, आर्थिक परिस्थितीचा सामना करायचा आहे.  आणि याच कामात आघाडीतील सर्व घटक काम करतील अशी आपेक्षा गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी व्यक्त केली.  

वळसे पाटील पुढे म्हणाले की, कोरोना मूळे उद्योग, शेती व्यापार याच दीड वर्षात मोठं नुकसान झालं. काही राज्यांच्या अर्थव्यवस्था खाली बसल्या. ही महामारी सुरू झाली तेव्हा याचं स्वरूप काय असेल? हे माहीत नव्हतं. देशाच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊन सुरू केलं तेव्हा गावखेड्यात रुग्ण वाढतील असं वाटत नव्हतं. मात्र नंतर परिस्थिती बदलली. सुरवातीला वाटलं नव्हतं एवढे रुग्ण वाढतील. ज्याच्याकडे पैसे आहेत तो पुण्याला मुंबईला जाईल मात्र ज्याला कुठेच आधार नाही तो कुठे जाईल? असा प्रश्न करत हे कोविड सेंटर गरिबांसाठी फायद्याचं ठरेल अस वळसे म्हणाले.(Corona will stay another year two years Take care  Home Minister Walse Patil)

अभिमान आणि आभार
कोविड सेंटरला मंजुरी मिळाल्यानंतर फक्त 29 दिवसांत हे सेंटर उभारल गेलं. या बाबत स्थानिक उद्योजक देवेंद्र शहा यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे शक्य झालं, असे गौरवोद्गार गृहमंत्री यांनी काढले. तालुक्यातील 58 पेक्षा जास्त दानशूर व्यक्तींनी व संस्थांनी 12 कोटी उभारले असून सरकारने 24 कोटी रक्कम मंजूर केली आहे. दानशूर व्यक्तींनी जे दान केलं त्यातून हे उभारलं याचा अभिमान आहे. सर्व अधिकारी मंडळींचे आभार गृहमंत्री वळसे यांनी मानले.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिबट्यांचा धुमाकूळ; घराच्या अंगणात एक, दोन नव्हे तर तीन बिबटे|VIDEO

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार, गरजेनुसार अधिनियमात बदल करण्याची तरतूद

Nitish Kumar: बिहारमध्ये नवं सरकार स्थापन होण्याआधीच राजकीय घडामोडी वाढल्या; नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ; पुण्यात शरद पवार गटाच्या उमेदवाराला बेदम मारहाण

टीम इंडिया आणि पाकिस्तान पुन्हा भिडणार? U-19 World Cup चं वेळापत्रक समोर, पहिला सामना कधी?

SCROLL FOR NEXT