paise
paise 
बातम्या

मृताच्या खिशातील पैसे लंपास करणाऱ्या वॉर्डबॉय विरोधात पोलिसात तक्रार दाखल ( पहा व्हिडिओ )

भूषण अहिरे

धुळे : मृताच्या Dead खिशातून रुग्णालयातील वॉर्डबॉय Wardboy यांनी ३५ हजार रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना धुळ्यातील Dhule श्री गणेशा Shri Ganesha या रुग्णालयामध्ये घडली आहे. शिरपूर Shirpur तालुक्यातील मांडळ येथील रहिवासी धनराज माळी यांना २७ तारखेला त्रास जाणवत असल्यामुळे, श्री गणेशा या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी दाखल केले होते. A complaint has been lodged with the police against Wardboy for stealing money from the deceased's pocket

उपचार सुरू असताना रुग्णाच्या संपर्कात नातेवाईक येऊ नये. यासाठी रुग्णाकडे एक लाख रुपये ठेवण्यात आले होते. त्यापैकी ६४ ते ६५ हजार रुपये उपचारादरम्यान खर्च झाले आणि उरलेले बाकीचे तब्बल ३५ हजार रुपये रुग्णाकडेच खिशात पडून होते. २९ तारखेला सकाळी रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णाच्या मृत्यूनंतर मृतदेह पॅक करण्यात आला. परंतु, या दरम्यान रुग्णालयातील वॉर्डबॉय यांच्याकडून मृताच्या खिशाची चाचपणी करण्यात आली होती.

त्यावेळेस मृताच्या खिशातून तब्बल ३५ हजार रुपये संबंधित वॉर्डबॉय यांनी काढून घेतले होते. आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर सर्व नातेवाईक हे शोकाकुल परिस्थितीमध्ये असल्यामुळे त्यांच्या ही बाब तेव्हा लक्षात आली नाही. परंतु, मृताचे अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर नातेवाईकांना मृताकडे उरलेले ३५ हजार रुपये असल्याचे लक्षात आले. अंत्यसंस्कार करत असताना मृताच्या खिशामध्ये पैसे नसल्याचं नातेवाईकांना आढळून आलेलं असल्यामुळे मृताच्या नातेवाइकांनी पुन्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. A complaint has been lodged with the police against Wardboy for stealing money from the deceased's pocket

रुग्णालय प्रशासनास यासंदर्भात विचारणा केली असता, रुग्णालय प्रशासनातर्फे उडवा उडवीची व अरेरावीची उत्तर मृत रुग्णाच्या नातेवाईकांना देण्यात आली असल्याचं रूग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी हात पाय जोडून सीसीटीव्ही CCTV फुटेज चेक करण्यास सांगितल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने सीसीटीवी फुटेज चेक करण्यास नकार दिले. परंतु, नातेवाईकांनी सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याचा तगादा लावल्यानंतर अखेर रुग्णालय प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज चेक केले. सीसीटीव्ही फुटेज मध्ये हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये वॉर्डबॉय हे मृताच्या खिशाची चाचपणी करून खिशातील पैसे काढताना स्पष्ट दिसले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनातर्फे १० हजार रुपये मृताच्या नातेवाईकांना देऊन शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु मृताच्या नातेवाइकांनी १० हजार रुपये घेण्यास नकार दिला आहे. मृतांच्या नातेवाईकांनी संपूर्ण पैसे रुग्णालय प्रशासनाकडे मागितली असून रुग्णालय प्रशासनाने बाकी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर अखेर मृताच्या नातेवाइकांनी देवपूर Devpur पोलिस Police ठाण्यात धाव घेतली आहे. A complaint has been lodged with the police against Wardboy for stealing money from the deceased's pocket

यासंदर्भात तक्रारीचा अर्ज दाखल झाल्यानंतर देवपूर पोलिस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर ताबडतोब गुन्हा दाखल करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन पत्रकारांशी बोलताना दिले आहे. यावर रुग्णालय प्रशासनातर्फे स्पष्टीकरण देताना संबंधित वॉर्डबॉय यांना कामावरून काढून टाकण्यात आले, असून पोलीस प्रशासन जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल असं स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मृताच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍या या आरोपींविरोधात विरोधात पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : काँग्रेस देशात कर्नाटक मॉडेल राबवण्याच्या प्रयत्नात, नरेंद्र मोदींची कोल्हापुरातून टीका

PM Modi Speech At Kolhapur : जगात भारी कोल्हापुरी... मराठीतून PM मोदींनी केली भाषणाची सुरूवात

Eknath Shinde Speech : 'धणुष्यबाण गेला पंजा आला'; कोल्हापुरातील सभेतून एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Bus Fire: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ३६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसने घेतला पेट

Priyanka Gandhi: महागाई, बेरोजगारी...; लातूरमधून प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT