बातम्या

'लाल कप्नान'च्या कमाईला धक्का

सिध्दी सोनटक्के

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुख्य भूमिका असणारा 'लाल कप्तान' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाचा टीझर, ट्रेलर आणि पोस्टर पाहता त्याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली होती. पण, प्रदर्शनानांतर मात्र या उत्सुकतेचं रुप पूर्णपणे बदललेलं दिसत आहे.

पहिल्या दिवसअखेर या चित्रपटाने फक्त ५० लाख रुपये इतकाच गल्ला कमवला. ज्यामुळे फक्त प्रेक्षकांनाच नव्हे, तर चित्रपच वर्तुळातील अनेकांनाच धक्का बसत आहे. १७६४ च्या बक्सर युद्धानंतरच्या २५ वर्षांनंतरच्या म्हणजेच १८व्या शतकातील कालखंडाच्या आधारे या चित्रपटाचं कथानक साकारण्यात आलं आहे.इंग्रज भारतात त्यांचं वर्चस्व वाढवत असतानाच मराठे, रुहेलखंडी आणि नवाबांमध्ये सुरु असणाऱ्या परस्पर मतभेदांच्या काळातील एक कथा या चित्रपटाच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे.

नवदीप सिंग दिग्दर्शित आणि सैफ अली खान, सोनाक्षी सिन्हा, मानव वीज, दीपक डोबरीयाल यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाकडून अनेकांनाच फार आशा होत्या. पण, हे समीकरण कुठेतरी चुकल्याचं किमान चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई पाहून लक्षात येत आहे. सैफच्या कारकिर्दीला कलाटणी देणार, असं म्हणत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा हा चित्रपट आता येत्या दिवसांमध्ये तरी तिकिटबारीवर समाधानकारक कमाई करतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

Hero Glamour X125 विरुद्ध Honda Shine 125; फीचर्स, मायलेज, कोणती बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे?

SCROLL FOR NEXT