बातम्या

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा अडचणीत सापडण्याची शक्यता 

सकाळ न्यूज नेटवर्क

विरार : लोकसभा निवडणुकीत सेनेचा बालहट्ट पुरविणाऱ्या भाजप नेतृत्वाने या वेळी सेनेला नालासोपारा मतदार संघ सोडू नये, अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी  कार्यकर्त्या मेळाव्यात एकमुखाने केल्याने मोठ्या धड्याक्यात एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचे स्वागत करणाऱ्या सेने पुढे आणि शर्मा पुढे अडचणी उभ्या राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

शिवसेनेने परस्पर नालासोपारा विधान सभेसाठी प्रदीप शर्मा यांची उमेदवारी  भाजपच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केल्याने नालासोपारा मतदार संघातील भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले असून त्यांनी या विरोधात काल नालासोपारा पूर्व येथील शादी डॉट कॉम मैदानावर एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकार्यांनी आपली मते मांडली. अनेक वर्षांपासून भाजप ही लोकसभा आणि विधानसभा यांचे नेतृत्व करत आहे. तरी वरिष्ठांनी युतीधर्माचे पालन करून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतशिवसेनेचा बालहट्ट पुरविताना पालघर लोकसभा सीट उमेदवार सकट शिवसेनेला दिली.

उमेदवारी दिल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना उमेदवारास निवडून आणले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत तुटपुंजे कार्यकर्ते असतानाही भाजपला याठिकाणी सेने पेक्षा २० हजार मते जास्त मिळाली असताना आता  १३२ नालासोपारा व १३३ वसई या दोन्ही जागा शिवसेनेसाठी सोडत आहेत असे समजते आणि शिवसेनेने परस्पर वसई आणि नालासोपारासाठी आपापले उमेदवारही जाहीर केल्याने त्यात भर पडत आहे. असे झाले तरं वसई तालुक्यातून भाजपचे अस्तित्वच संपणार असून त्याला कार्यकर्ते म्हणून आमचा विरोध असल्याचा ठराव या मेळाव्यात घेण्यात आला म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत ही १३२ नालासोपारा विधानसभा भाजपलाच मिळाली पाहिजे. कार्यकर्त्यांनी घेतलेल्या ह्या निर्णयामुळे एन्काउंटर स्पेशालिस्ट सेनेचे उमेदवार प्रदीप शारमा यांच्या अडचणीत वाढ होणार असून युतीत हि जागक कोणाला मिळते हे पाहणे मजेशिरर ठरणार आहे. 

या कार्यक्रमात राज वर्मा, हरेंद्र  पाटील, राजेंद्र सिंघ ठाकूर, अजित अस्थाना, संजोग यंदे, संजय पांडे, श्रीमती आम्रपाली साल्वे, गोपीनाथ नागरगोजे, प्रदीप यादव, विजयप्रकाश दुबे, शरद सुर्वे, माझी नगरसेवक देवीदास खोत,भाजपचे महामंत्री मनोज बारोट  आणि असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


Web Title: BJP claim on Nalasopara assembly seat Pradip Sharma on trouble
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

Kalyan Lok Sabha: मुख्यमंत्र्यांच्या पुत्रासाठी पंतप्रधान मैदानात! श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी कल्याणमध्ये मोदींची होणार सभा

Shani Dosh: तुम्हाला नेहमी अडचणी येतात? 'हे' आहेत शनिदोषाची लक्षणं

Today's Marathi News Live : मनोज जरांगे पाटील यांच्या बेळगावमधील सभेला कर्नाटक सरकारची परवानगी

SCROLL FOR NEXT