बातम्या

दोन्ही पक्षातील नेत्यामधे मतभेद 

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : भाजप-शिवसेना युतीची घोषणा झालेली असली तरी दोन्ही पक्षातील बंडोबांच्या रुद्रावताराने युतीवर मैत्रीपुर्ण लढतीचे सावट ओढावण्याची शक्यता आहे. जे मतदारसंघ भाजपला सुटले तिथे शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर जे मतदारसंघ शिवसेनेला सुटले तिथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी टोकाची भूमिका घेतली आहे. यामुळे बहुतांश मतदारसंघात बंडखोरांनी उमेदवारी दाखल करण्याचा निर्धार केल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दमछाक सुरू झाली आहे. 

दरम्यान, युतीमधल्या बंडखोरांच्या धास्तीने भाजप व शिवसेनेनं सर्वच्या सर्व मतदारसंघात एबी फाॅर्मचे पोहचवले असून ऐनवेळी कोणतीही गडबड नको यासाठीची पुर्वतयारी केली आहे. 

या सर्व परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी युतीमधे काही जागांवर मैत्रीपुर्ण लढती करण्याची नवी खेळी समोर आणली असून दोन्ही पक्षातील नेत्यामधे यावर मतभेद सुरू झाले आहेत. 

शिवसेनेनं युती करताना पुर्णपणे भाजपच्या शब्दावर विश्वास ठेवला. पण अनेक मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. तर शिवसैनिकांनी देखील नाशिक, पुणे व नागपूर सारख्या शहरात बंड करण्याची तयारी सुरू केली आहे. या सर्व परिस्थितीमधे काॅग्रेस व राष्ट्रवादीने या बंडखोरांना बगल देत उमेदवारी यादी जाहिर केल्यामुळे युतीच्या ईच्छुकांमधे कमालीचा संताप सुरू असल्याचे चित्र आहे. 

भाजपने सर्वच्या सर्व 288 मतदारसंघात एबी फाॅर्म पाठवले याची माहिती मिळताच शिवसेने देखील सर्व मतदार संघात एबी फाॅर्म रवाना केले आहेत.

Web Title: BJP and Shivsena may be contest friendly in Maharashtra Vidhan Sabha 2019
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: ४० वर्षांनंतर ७० व्या वर्षी दाऊदला पकडलं! १९८४ साली केलेल्या अक्षम्य 'पापा'चे घडे भरले!

Jasmine Bhasin : जास्मिन भसीनचा ग्लॅमरस लूक; वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसतेय खास!

Today's Marathi News Live : आदित्य ठाकरे यांचा उद्या मावळ लोकसभा दौरा

Tamannaah Bhatia : चांद तू नभातला नि बावळा चकोर मी

Nanded Crime News: गुंडाचा नांदेड पाेलिसावर गोळीबार, धुमश्चक्रीनंतर तिघांना अटक

SCROLL FOR NEXT