बातम्या

बिहारच्या हॉटेलमध्ये सापडल्या ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट

सकाळ न्यूज नेटवर्क

पाटणा : बिहारमधील मुजफ्फरपूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदानावेळी एका हॉटेलमध्ये ई्व्हीएम आणि व्हीव्हीपॅट सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी मतदान पार पडले. यावेळी बिहारमधल्या मुजफ्फरपूर लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू असताना एका हॉटेलमध्ये चार ईव्हीएम सापडल्याने एकच खळबळ उडाली. विरोधी पक्षांकडून या प्रकरणी गोंधळ घालण्यात आला. सेक्टर मॅजिस्ट्रेट अवधेश कुमार हॉटेलमध्ये सापडलेल्या ईव्हीएमचे संरक्षक होते. माझ्याकडे 4 ईव्हीएम मशीन होत्या. एखाद्या मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यास या अतिरिक्त ईव्हीएमचा वापर केला जाणार होता, असं स्पष्टीकरण कुमार यांनी दिले आहे. 

हॉटेलमध्ये ईव्हीएम सापडल्यानंतर एसडीओ कुंदन कुमार घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चारही ईव्हीएम ताब्यात घेतल्या. मुजफ्फरपूरचे जिल्हाधिकारी आलोक रंजन घोष यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. याशिवाय अवधेश कुमार यांना बेजबाबदारपणाबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली.

Web Title: Bihar evms and vvpat found from a hotel in Muzaffarpur

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Benifits of Walnuts in Summer: उन्हाळ्यात अक्रोड खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित आहे का?

Online Ration Card : घरबसल्या बनवा तुमचं रेशन कार्ड; कसं? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Agriculture News : उन्हाळी मुगावर करपा रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादनात घट होण्याची शक्यता

Sharad Pawar: भारी गडी दिसतोय, लक्ष ठेवलं पाहिजे.. शरद पवारांनी सांगितला 'आर.आर.आबांच्या' राजकीय एन्ट्रीचा किस्सा!

PM Modi Speech: 'चहा विक्रेत्याने देशाची अर्थव्यवस्था ११ वरून ५व्या क्रमांकावर आणली'; पीएम मोदींनी गुजरातमध्ये काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT