Film  
बातम्या

सावधान ! बॉलिवूड आणि जाहिरातींमध्ये कामाची संधी शोधत असाल, तर ही बातमी नक्कीच वाचा

अजय दुधाणे

मुंबई : बॉलिवूड Bollywood आणि जाहिरातींमध्ये Advesrtising मध्ये काम देण्याच्या नावाखाली शेकडो नागरिकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा Fraud घालणाऱ्या तरूणाला सायबर Cyber पोलिसांनी Police अटक Arrest केली आहे. अपूर्व अश्विन दौड़ा उर्फ डॉक्टर ऋषि श्रॉफ असे या आरोपीचे नाव आहे. Be careful! If you are looking for a job opportunity in Bollywood and advertising, read this news

आरोपीने आतापर्यंत शेकडो नागरिकांना या भूलथापा देऊन कोट्यावधी रुपये त्यांच्याकडून उकळल्याची माहिती पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली. अपूर्वने नागरिकांची फसवणूक करण्यासाठी झारा किड्स आणि जारा वर्ल्ड या दोन बनावट वेबसाइट्स Websites बनवल्या होत्या.

या दोन्ही संकेतस्थळांची लिंक आणि त्या खाली आम्ही टेलिव्हिजन जाहिरातींसाठी कास्ट करीत आहोत. आपणास इंटरेस्ट असल्यास कृपया नाव, जन्मतारीख व्हॉट्सऍप  क्रमांकावर पाठवा किंवा आम्ही बॉलीवूड चित्रपटांसाठी कास्ट करीत आहोत. आपल्या मुलाचे वय 2 ते 14 दरम्यान असेल तर कृपया आपल्या मुलांचा फोटो आणि जन्मतारीख पाठवा " असा संदेश लिहून पाठवायचा. नागरिक या जाहिरातींना भुलून संबधित लिंक किंवा वेबसाईटला भेट द्यायचे.

त्यानंतर नागरीकांनी रजिस्टर केलेल्या नंबरवर फोन करून हा आरोपी त्यांना मुलांच्या शूट साठी कपडे घ्यायचे आहेत. शूटसाठी परवानगी घ्यायची आहे. अशी विविध कारणे सांगून संबधित व्यक्तींकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक करायचा. अपूर्वने अशा प्रकारे शेकडो नागरिकांची आतापर्यंत कोट्यावधी रुपयांना फसवणूक केली असून ही फसवणूक करण्यासाठी त्याने बँकेची १८ खाती वापरले आहे.

तर मोबाइल लोकेशन लपविण्यासाठी त्याने ९ मोबाइल फोन यातील ८ आयफोन आणि १ सॅमसंग फोनचा वापर केलाय. पोलिसांना त्याच्याकडे ४० सिमकार्ड सापडले आहेत.

हे देखील पहा -

तपासात अपुर्वने बऱ्याच कार्यक्रमांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले असल्याचे समोर आले आहे. त्याचे शिक्षण अमेरिकेच्या कोलोरॅडो येथील टीएफटी बिझिनेस स्कूलमधून झाले आहे.  

अपूर्व देशाच्या वेगवेगळ्या राज्यात ऑफिस भाड्याने घेऊन लोकांची फसवणूक करायचा आणि लोकांशी संपर्क साधण्यासाठी व्हाट्सएप कॉलिंग व व्हीपीएन कॉलिंगचा वापर करून फसवणूक करायचा. नुकतीच त्याने महेश गुप्ता जो विमानाच्या सुटे भागाचा ऑनलाइन व्यवसाय करतो त्याची ऑनलाइन ३२ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक केली होती.

२०१७ पासून त्याचे हे उद्योग सुरू असून फसवणूकीच्या पैशातून तो मौज मजा करायचा. त्याला महागड्या गाड्यांचे खूप आकर्षण असल्याने तो या पैशातून फिरण्यासाठी मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, पोर्चे यासारख्या लक्झरी वाहनांचा वापर करीत होता.

Edited By : Krushnarav Sathe 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT