बातम्या

या हल्ल्याचा बदला जरूर घेतला जाईल : CRPF

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 'जैश-ए-महंमद' या दहशतवादी संघटनेने केलेल्या नृशंस हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 44 जवान हुतात्मा झाले असून, यावर केंद्रीय राखीव दलाने पहिल्यांदा ट्विटरवर प्रतिक्रीय नोंदवताना आम्ही विसरणार नाही आणि आम्ही माफही करणार नाही असा इशारा दिला आहे.

तसेच, पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना आम्ही सलाम करतो आणि आमच्या हुतात्मा बंधूंच्या कुटुंबीयांबरोबर आम्ही असल्याचे केंद्रीय राखीव पोलिस दलाने ट्विटद्वारे सांगितले. या हल्ल्याचा बदला जरूर घेतला जाईल असेही सीआरपीएफच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पुलवामा हल्ल्यातील शहिदांना आम्ही वंदन करतो. आम्ही आमच्या शहीद भावंडांच्या कुटुंबांसोबत आहोत. या भ्याड हल्ल्याचा बदला घेऊ,' असं ट्विट त्यांनी केलं आहे. दहशतवाद्यांना थेट आणि स्पष्ट इशारा देणारं सीआरपीएफचं हे ट्विट महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. 

Web Title: We will not forget, we will not forgive says CRPF

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : परभणीत रोजगार हमीतील संतप्त मजुरांनी पंचायत समिती कार्यालयात प्राशन केलं कीटकनाशक

Madhuri Dixit: क्या खुब लगती हो; धकधक गर्लचा ट्रेडिशनल लेहंगा लूक!

Lok Sabha Election 2024 : नवी मुंबईत भाजपमध्ये अचानक राजीनामासत्र; निवडणूक धामधुमीत असं काय घडलं?

DJ ban in Buldana : महाराष्ट्रातला हा जिल्हा झाला 'डीजेमुक्त'; बुलडाण्यात थेट बंदी, कारणेही तशी गंभीर

Pakistan Squad: पाकिस्तानकडून १८ सदस्यीय संघाची घोषणा! टीम इंडियाला नडणाऱ्या गोलंदाजाचं कमबॅक

SCROLL FOR NEXT