Akola Super Speciality Hospital
Akola Super Speciality Hospital 
बातम्या

अकोल्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कोरोना महामारीतही उपयोगी नाहीच

जयेश गावंडे

अकोला : अकोल्यातील Akola सुपरस्पेशालिटी या रुग्णालयाच्या Hospital इमारतीला बांधून दोन वर्ष झाले आहे. परंतु, हे रुग्णालय अजूनही निर्माणाधीन आहे. या रुग्णालयात बेड, औषधांची व्यवस्था, आवश्यक लागणाऱ्या मशिन्स अजूनही उपलब्ध झालेले नाही. तसेच मनुष्यबळ अद्यापही मंजूर नाही. त्यामुळे ही इमारत सध्या शोभेची वास्तू असून रुग्णांसाठी ही कुठेही उपयोगी येत नाही. Akola Superspeciality Hospital not Functional Yet

राज्यासह अकोल्यात Akola कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत आहे. अकोल्यातील शासकीय रुग्णालयावर जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातील रुग्णही Corona Patients मोठ्या संख्येने भरती होत आहेत. भविष्यात ही संख्या अधिक वाढण्याची भीती आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणखी बेड व त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मनुष्यबळ आणि आवश्यक औषधांची गरज भासणार आहे.

त्यामुळे ही उणीव भरून काढण्यासाठी नवीन रुग्णालयाची Hospital गरज आहे. अशा बिकट परिस्थितीतही हे रुग्णालय केवळ धूळ खात पडल्याची स्थिती आहे. हे रुग्णालय आता सुरू झाल्यास कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत याचा चांगला उपयोग होऊ शकतो. येथे भरपूर बेडचे Bed हॉस्पिटल निर्माण होऊ शकते. मात्र येथील तांत्रिक अडचणींमुळे हे हॉस्पिटल सुरू होणार नसल्याची खंत आहे. Akola Superspeciality Hospital not Functional Yet

दरम्यान आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर Jitendra Papalkar, आमदार गोपिकीशन बाजोरिया Gopikishan Bajoria, जीएमसी अधिष्ठाता यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या रुग्णालयाची पाहणी केली. मात्र, येथील अडचणींमुळे हे रुग्णालय सुरू होणार नसल्याचं सांगण्यात आले आहे.

कोरोना पहिल्या लाटेत अकोल्यातील Akola हे  सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू होण्याची आशा होती मात्र त्याही वेळी सुरू झाले नाही. त्यामुळे करोडो रुपये खर्च करून बांधलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय महामारीच्या संकटात तरी कामी पडो हीच अकोलेकरांना अपेक्षा आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News: मुख्यमंत्रीपदाच्या मोहासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Thane Lok Sabha: कोण होणार ठाण्याचा खासदार? ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने

Salman Khan House Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात गँगस्टर रोहित गोदाराची एन्ट्री

Pune News : रात्री 12 वाजता बॅंक सुरु! निवडणूक आयोगाची बॅंकेवर मोठी कारवाई

Special Report : Election Scam | माढ्यात नकली नोटांचा पाऊस! उत्तम जानकरांचा आरोप काय?

SCROLL FOR NEXT