पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील PDCC बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेवल्या प्रकरणी बॅंकेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केलीय. रात्री PDCC बँकेत 40 ते 50 लोक रात्री संशयतरीत्या फिरत असल्याचे CCTV मध्ये भरारी पथकाच्या निदर्शनास आले. त्याचबरोबर रोहित पवार यांनी ही वेल्हा PDCC बँकेचा रात्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानुसार भरारी पथकाने खातरजमा करून आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.