बातम्या

आता आरेमधील भातशेतीदेखील होणार नष्ट

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई: शनिवारी पहाटे पाच वाजेपर्यंत १,७०० झाडे गारद झाली होती. ७० लोकांचे मनुष्यबळ त्यासाठी कार्यरत होते. त्यापैकी १५ जण हे वृक्षतोडीतील निष्णात होते. मोठी झाडे इलेक्ट्रिक करवतींच्या साहाय्याने कापली जात होती. पाच मिनिटाला एक झाड असा वृक्षतोडणीचा वेग होता. शनिवारी रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वच्या सर्व २१८५ झाडे नेस्तनाबूत झाली. त्यानंतर तोडलेल्या झाडांचे ओंडके एकत्र करणे, ते ट्रकमध्ये टाकणे, असे काम सुरू होते. ही कामे मार्गी लागल्यानंतर उर्वरित ४६५ झाडांचे पुनर्रोपण करण्याची प्रक्रिया सुरू होईल.वृक्ष प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यापासून मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन वृक्ष छाटणीसाठी तयारीत होते. आरे कार डेपो विरोधातील अर्जदारांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वृक्ष छाटणीस सुरुवात झाली. मात्र जन आंदोलन सुरू झाल्यामुळे काम थांबले. पोलिसांनी आंदोलकांची नाकाबंदी केल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास पुन्हा वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यास सुरूवात झाली. दरम्यान, आरेतील आदिवासी पाड्यांचे स्थलांतर करण्यात येणार असून यावेळी त्यांची भातशेतीही नष्ट होणार आहे.

एमएमआरडीए मुंबई व परिसरात मेट्रोचे १४ प्रकल्प राबवत आहेत. हे मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी आरेत २२ मजल्यांचे मेट्रो भवन बांधले जाणार आहे. मात्र या भवनासाठी वृक्ष तोडण्याची गरज नाही, असा एमएमआरडीएचा दावा आहे. मुंबई महापालिका आरेत २६० एकर परिसरात प्राणी संग्रहालय बांधणार आहे. त्यात आदिवासींच्या दोन पाड्यांचे स्थलांतर करावे लागणार आहे. त्यांची भातशेतीही नष्ट होईल. राज्य सरकार झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प आरेत राबवणार आहे.

Web Title now aareys rice crop in trouble

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

Beet juice : या लोकांनी चुकूनही पिऊ नये बीटचा ज्यूस

Dharashiv News : धाराशिवमध्ये १६ बालकांना इंजेक्शनची रिअॅक्शन; ताप, उलटीमुळे हैराण

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

SCROLL FOR NEXT