Mla yashomati thakur, amravati, nafed saam tv
ऍग्रो वन

Nafed ची खरेदी बंद झाल्याने Yashomati Thakur संतापल्या, अधिकाऱ्यांना झाप-झाप झापले

आता शेतकऱ्यांनी जवळ असलेला चणा तो कुठे न्यायचा, असा प्रश्न आमदार यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati News : नाफेड खरेदी बंद केल्याने आमदार यशोमती ठाकूर (mla yashomati thakur) या आक्रमक झाल्या आहेत. आमदार ठाकूर यांनी फोनवरून नाफेड (nafed) खरेदी का बंद केली गेली असा सवाल करीत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. शिंदे सरकार (eknath shinde government) बोलत एक आणि करते एक अशी टीका माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी शिंदे सरकारवर केली. (Maharashtra News)

अमरावती (amravati) जिल्ह्यतील तिवसा येथे शेतकऱ्यांनी लाखो रुपयाचा माल हा नाफेडच्या खरेदी केंद्रावर आणला असतानाच अचानक अधिकारी यांनी नाफेड खरेदी बंद केली. त्यामुळे आमदार यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्या. त्यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून चांगलेच खडसावले.

खरेदी बंद करणे हा एक प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय आहे. यामुळे शेतकऱ्यांचे (farmers) मोठे नुकसान होत आहे. वरिष्ठ अधिकारी फोनवरून सांगतोय की नाफेड खरेदी बंद करा, नेमक यांचे टार्गेट किती आणि आता शेतकऱ्यांनी जवळ असलेला चणा तो कुठे न्यायचा, असा प्रश्न आमदार यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला.

हे जे ईडी सरकार आहे हे बोलत एक आणि करता एक अशी टीका आमदार ठाकूर यांनी केली. कार्यक्रमासाठी हे सरकार पंधरा कोटी रुपये खर्च करतात आणि शेतकऱ्यांसाठी यांच्या जवळ रुपया नाही हा अन्याय आम्ही का म्हणून सहन करायचा लेखी आदेश न देताच जर नाफेडची खरेदी बंद केल्यास आम्ही आंदोलनात्मक पवित्रा घेऊ असा इशारा माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी शिंदे सरकारला दिला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT