Turmeric Price Saam Tv
ऍग्रो वन

Turmeric Price : हळदीच्या दरात तेजी; रिसोड बाजार समितीत हळदीला १४ हजारांचा दर

Washim News : वाशिमच्या रिसोड बाजार समितीत हळदीला चांगला दर मिळाला होता. मात्र गेल्या आठवड्यातच हळदीच्या दरात तब्बल एक हजार रुपयांची घसरण झाली होती.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: वाशिमच्या मार्केटमध्ये हळदीच्या दारात चढ उतार होत असल्याचे वारंवार पाहण्यास मिळत आहे. मागील आठवड्यात हळदीच्या दरात घसरण झाली होती. यानंतर मागील काही दिवसांपासून हळदीच्या दरात पुन्हा दरात वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे. 

वाशीम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली जात असते. यामुळे जिल्ह्यातील बाजार पेठेत हळदीची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असते. दरम्यान मागील आठवड्यात वाशिमच्या रिसोड बाजार समितीत हळदीला चांगला दर मिळाला होता. मात्र गेल्या आठवड्यातच हळदीच्या दरात तब्बल एक हजार रुपयांची घसरण झाली होती. यानंतर आता पुन्हा दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांसाठी आनंदाचे वातावरण आहे. 

१४ हजाराचा टप्पा पार 

वाशिमच्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या दराने १४ हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे. यात कांडी हळदीला १२ हजार ५०० ते १४ हजार रुपये प्रति क्विंटलचा इतका दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर हळद गटुला १२ हजार ८०० ते ११ हजार रुपयांचे दर मिळाले. अर्थात हळदीच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांसाठी फायदा होत आहे. 

या दरम्यान वाशीम जिल्ह्यातील सहाही तालुक्यांत हळदीची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढत असून गत हंगामात हळदीला १९ हजारांहून अधिक दर मिळाला होता. परंतु त्यानंतर झालेल्या घसरणीमुळे शेतकरी चिंतेत होते. आता मात्र दरातील सुधारणा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला असून या तेजीमुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या हंगामासाठी उत्साहाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT