Washim News Saam tv
ऍग्रो वन

Washim News : शेतशिवरातून २०० हुन अधिक स्प्रिंकलर तोट्यांची चोरी; भापुर शिवारातील शेतकऱ्यांचे नुकसान

Washim News : भापुरच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात गहू, हरभरा पिकांची आहे. या पिकांच्या सिंचनासाठी स्प्रिंकलर पाईप आणि तोट्या बसविल्या आहेत.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : शेतात ठेवलेले साहित्य देखील आता सुरक्षित राहिलेले नाही. याचा प्रत्यय वाशिमच्या भापुर गावाच्या (Washim) शेत शिवारात आला आहे. शेतात पिकांना पाणी देण्यासाठी लावलेल्या स्प्रिंकलर तोट्या चोरून नेल्याचे समोर आले आहे. यात (Farmer) शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. (Latest Marathi News)

वाशीम जिल्ह्यातील भापुरच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात (Wheat) गहू, हरभरा पिकांची आहे. या पिकांच्या सिंचनासाठी स्प्रिंकलर पाईप आणि तोट्या बसविल्या आहेत. त्यातील २०० हुन अधिक तांब्याच्या तोट्या चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरून नेल्या. या (Theft) चोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली असून वारंवार होणाऱ्या स्प्रिंकलर तोट्या चोरीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून शेती सिंचनाचा प्रश्न ही त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सव्वालाखाचे नुकसान 

भापूरच्या शेतशिवारातून १२ शेतकऱ्यांच्या १ लाख २० हजार किंमतीच्या दोनशेहून अधिक तांब्याच्या स्प्रिंकलर तोट्या चोरुन नेल्याची घटना रात्रीच्या दरम्यान घडली आहे. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. यामुळे आता या स्प्रिंकलर तोट्या चोरणाऱ्यांना पकडण्याचे आव्हान रिसोड पोलिसांसमोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Box office collection: 'कंतारा १' ने पार केला ५०० कोटींचा टप्पा; 'सनी संस्कार...'च्या कमाईत घट, कलेक्शनचा आकडा किती?

Singada Benefits : शिंगाडे संजीवनीपेक्षा कमी नाही; ५ फायदे वाचून व्हाल चकीत, आजच आहारात करा समावेश

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

New Flyover: गुड न्यूज! मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, कुर्ला ते घाटकोपरपर्यंत तयार होणार उड्डाणपूल

Dhangar Reservation : आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; सुसाईड नोट आढळल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT