Kharif Crop Loan Saam tv
ऍग्रो वन

Kharif Crop Loan : खरीप हंगामासाठी पीक कर्ज; शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी टोल फ्री क्रमांकाची सुविधा

Washim News : ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे. असे बागायतदार शेतकरी मी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच लागवड करण्यास सुरवात करत असतात

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : खरीप हंगाम तोंडावर असल्याने पीक कर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना (farmer) पीक कर्जासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या समस्या लक्षात घेऊन (Washim) वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध केली.

खरीप हंगाम (Kharif Season) सुरु होण्यास अजून महिनाभराचा कालावधी आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे. असे बागायतदार शेतकरी मी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच लागवड करण्यास सुरवात करत असतात. यामुळे खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वीच शेतकऱ्यांची पीक कर्ज (Crop Loan) घेण्यासाठी बँकांमध्ये आतापासून फेऱ्या मारण्यास सुरवात झाली आहे. या शेतकऱ्यांना बऱ्याचदा बँकांकडून अडवणूक करत फिरवाफिरव केली जात असते. हे प्रकार टाळण्यासाठी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. 

अडचण आल्यास करा तक्रार 
टोल फ्री क्रमांकावर केवळ पीककर्जासंबंधी तक्रारी, अडचणी मांडता येणार आहेत. या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी. तक्रार नोंदविताना शेतकऱ्यांनी आपलं नाव, बँकेचे नाव आणि बँकेच्या शाखेच्या नावाचाही तपशील द्यावा; असं आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

SCROLL FOR NEXT