Soyabean Price Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Price : नव्या सोयाबीनला दर कमीच; जुन्या सोयाबीनपेक्षा ६३५ रुपये कमी दर

Washim News : यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. दरम्यान यंदा झालेल्या अति पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम : यंदाच्या खरीप हंगामात लवकर पेरणी केलेल्या क्षेत्रातील सोयाबीनची काढणी झाली असून शेतकरी विक्रीसाठी बाजारात आणत आहे. मात्र मार्केटमध्ये नवीन सोयाबीनला जुन्यापेक्षा कमी दर मिळत आहे. हे दर तब्बल ६३५ रुपयांनी कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत आहे. 

यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. दरम्यान यंदा झालेल्या अति पावसामुळे सोयाबीन (Soyabean Price) पिकाचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे उत्पन्नावर देखील याचा परिणाम झाला आहे. लवकर लागवड करण्यात आलेल्या सोयाबीनची काढणी झाली असून सोंगून बाजारात विक्रीस देखील आले आहे. मात्र जुन्या सोयाबीनच्या तुलनेत या नव्या सोयाबीनला ६३५ रुपयांनी कमी दर दिला जात असल्याचे चित्र वाशिमच्या (Washim) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहावयास मिळाले आहे. 

नव्या सोयाबीनला ३८०० रुपये दर 

वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नव्या आणि जन्या सोयाबीनची एकुण ४३०० क्विंटल आवक झाली. त्यातील जुन्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ४४३५ ते ४६४५ रुपयांचा दर मिळाला, तर नव्या सोयाबीनला मात्र प्रतिक्विंटल ३८०० ते ४२७० रुपयांचा दर देण्यात आला.  शेतीमालात होत असलेल्या दरातील दुजाभावामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सर उमटत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेससोबत आघाडी होणार नाही, वंचितकडून मोठी घोषणा

Mrunal Thakur: मराठमोळी थोडीशी साधीभोळी; धुळ्याची लेक पैठणीत दिसतेय लय भारी

Vrishabh Hororscope 2026: अचानक धनलाभ होणार, पाहा कसं असेल वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी पुढचं वर्ष?

Lagnacha Shot: लग्नाचा शॉटमध्ये प्रियदर्शिनी- अभिजीत घालणार गोंधळ

Kitchen Hacks : मॉड्युलर किचन बनवत आहात, मग या गोष्टी लक्षात घ्या

SCROLL FOR NEXT