Washim News saam tv
ऍग्रो वन

Washim Krushi Utpanna Bazar Samiti News : वाशिम बाजार समिती सभापतिपदी दामू अण्णा गोटे, गोवर्धन चव्हाण उपसभापती

आज पदाधिकारी निवडी बिनविराेध झाल्या.

Siddharth Latkar

- मनाेज जयस्वाल

Washim Bajar Samiti News : वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी आज (मंगळवार) झालेली निवडणूक बिनविराेध झाली. शेतकरी विकास पॅनलचे दामू अण्णा गोटे यांची सभापती पदी तसेच गोवर्धन चव्हाण यांची उपसभापती पदी निवड झाली. (Maharashtra News)

वाशीम जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित शेतकरी विकास आघाडीने घवघवीत यश मिळवून बाजार समितीवर झेंडा फडकविला हाेता.

या निवडणुकीत काट्याच्या दुरंगी लढतीत शेतकरी सहकार पॅनलने सहा जागांवर विजय मिळवित आपले अस्तित्व सिध्द केले. प्रारंभी तिरंगी वाटणारी ही निवडणूक थेट दुरंगी झाली. शेतकरी विकास पॅनलमध्ये निवडून आलेले बहुसंख्य संचालक माजी संचालक होते. या बाजार समितीत शेतकरी विकासला ९ जागा तर शेतकरी सहकार पॅनलला ६ जागा मिळाल्या तर मार्केट बचाव पॅनलचा या निवडणुकीत धुव्वा उडाला.

दरम्यान आज वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिका-यांच्या निवडी हाेत्या. या बाजार समितीमधील तीनही अपक्ष उमेदवार शेतकरी विकास पॅनलमध्ये गेल्याने पदाधिकारी निवडी अविरोध झाली.

शेतकरी विकास पॅनलचे दामू अण्णा गोटे हे सभापती तर गोवर्धन चव्हाण हे उपसभापती पदी बिनविरोध निवडून आले. काँग्रेसचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष चक्रधर गोटे यांनी वाशिम बाजार समितीवर सत्ता कायम ठेवली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: प्राजक्ता जणू सौंदर्याची खाण...

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

SCROLL FOR NEXT