Wardha News Saam tv
ऍग्रो वन

Wardha News : वर्धा जिल्ह्यातील अनेक गावांना वादळी तडाखा; संत्र्याची झाडे उन्मळून जमीनदोस्त

Wardha News : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यात गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास पावसासह गारपीट झाली. या गारपीटीमुळे शेतीपिकांसह भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे.

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील अनेक गावांना गुरुवारी रात्री वादळ, गारपीट, अवकाळी (Wardha) पावसाचा जबर तडाखा बसला आहे. यात संत्रा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या अचानक आलेल्या संकटामुळे शेतकरी (Farmer) हवालदील झाला आहे. (Live Marathi News)

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यात गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास पावसासह (Rain) गारपीट झाली. या गारपीटीमुळे शेतीपिकांसह भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे. मागील आठवड्यात सलग दोन दिवस जिल्ह्याच्या देवळी, आर्वी, हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्यात गारपीट होत नुकसान झाले होते. तर आता कारंजा तालुक्यातही गारपीटीने नुकसान केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्याच्या संकटात भर 

जोरदार वारा असल्यामुळे संत्र्याची झाडे उन्मळून जमीनदोस्त झाली आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतातील संत्रा गळून पडल्या आहेत. मोठ्या प्रमाणात संत्रा गळल्याने जमिनीवर संत्रा फळांचा जणू काही सडाच पडला आहे. नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. शासनाने नुकसानीची मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरला येऊन फक्त षडयंत्र केलं जातंय- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT