Orange Alert In Wardha Saam tv
ऍग्रो वन

Orange Alert In Wardha : वर्धा जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट; सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस

Wardha News : तीन दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे आता हिवाळा की पावसाळा असा प्रश्नच नागरिकांना पडला आहे

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होत आहे. मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पाऊस येत आहे. (Wardha) वर्धा जिल्ह्यात देखील सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचे (Rain) आगमन झाले असून जिल्ह्यात ३० नोव्हेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

वर्धा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून पावसाचे देखील आगमन झाले आहे. यात आज तिसऱ्या दिवशीही अवकाळी (Rain Alert) पावसाने हजेरी लावली आहे. तीन दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे आता हिवाळा की पावसाळा असा प्रश्नच नागरिकांना पडला आहे. हवामान विभागाने वर्धा जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट सांगितले आहे. यामुळे जिल्ह्यात आणखी पाऊस पडणार असून नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेती पिकांचे नुकसान 

सततच्या होत असलेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील कापूस आणि तुरीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय ज्वारीचे देखील नुकसान होत आहे. यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी आता करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT