Electric Shock Saam tv
ऍग्रो वन

Wardha News : पतीचा डोळ्यादेखत मृत्यू; शेतात गेले असता बसला विजेचा जोरदार झटका

Wardha News : शेतात सध्या कामे सुरु असून राजेश नांदणे हे पत्नीसोबत शेतात कामासाठी गेले होते. यावेळी हि दुर्दैवी घटना घडली

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्याला विजेचा जोरदार झटका लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. शेतकऱ्याला विजेचा धक्का बसला यावेळी त्याची पत्नी देखील शेतात होती. पतीला विजेचा धक्का लागल्याने तिने आर्डर ओरड केली. मात्र शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. सदरची घटना आष्टी तालुक्याच्या भिष्णूर गावात घडली.

वर्धा (Wardha) जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील भिष्णूर गावातील राजेश भीमराव नांदणे ( वय ४२) असे मृतक झालेल्या शेतकऱ्याचे (Farmer) नाव आहे. मृतक राजेश नांदणे यांच्याकडे दोन एकर शेती आहे. शेतात कपाशी व सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. शेतात सध्या कामे सुरु असून राजेश नांदणे हे पत्नीसोबत शेतात कामासाठी गेले होते. यावेळी हि दुर्दैवी घटना घडली आहे. 

राजेश पत्नीसह शेतात गेला होता. शेतात फिरत असतांना शेताच्या धुऱ्यावर गेला असता तो अचानक खाली पडला. जमिनीवर पाडल्यानंतर हातपाय हलवू लागला. हे दृश्य पाहून त्याची पत्नी ओरडली असता लगतच्या शेतातील शेतकरी व मजूर (Electric Shock) धावत आले. त्यांनी पाहणी केली असता राजेशच्या हातात वीज तार दिसून आली. तर त्याच्या अंगातून धूर निघत होता. त्याला विजेचा जोरदार धक्का लागल्याने तो जागीच मृत पावला. पतीचा डोळ्यादेखत मृत्यू झाल्याने पत्नीने एकच आक्रोश केला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

Actress Death: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Chikoo Benefits: डायबिटीज असलेली व्यक्ती चिकू खाऊ शकते का? जाणून घ्या

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

SCROLL FOR NEXT