Vegetables Price Hike in Nashik Saam Tv
ऍग्रो वन

Vegetables Price Hike: नाशकात भाज्याचे दर कडाडले; पहा काय आहेत भाज्यांचे दर...

Vegetables Price Hike in Nashik: नाशकात भाज्यांचे दर वाढल्याने मुंबईतही भाजीपाला महाग होऊ शकतो.

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक: आवक मंदावल्यानं नाशिकमध्ये भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. शेवगा, वांगी, भेंडी, हिरवी मिरची, शिमला, फ्लॉवरसह अन्य भाज्यांचे दर वाढले असल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर आता ताण पडणार आहे. किरकोळ बाजारात शेवगा आणि वांगी 80 रुपयांवर पोहोचले आहेत. नाशिकमध्ये दर वाढल्याने मुंबईतदेखील भाजीपाला (Vegetables) महाग होऊ शकतो. (Latest Vegetables Rates in Nashik)

हे देखील पहा -

नाशिकमधून (Nashik) दररोज मोठ्या प्रमाणात भाजीपाला मुंबईला (Mumbai) जातो. मात्र नाशिकमध्येच भाजीपाला आवक घटल्याने नाशिकमध्ये भाजीपाला महागला (Price Hike) आहे. याचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांनाही बसू शकतो. कारण नाशकात भाज्यांचे दर वाढल्याने मुंबईतही भाजीपाला महाग होऊ शकतो. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने शेतीचे काही प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे उत्पादन कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती झाल्याने भाजीपाला महागला आहे.

भाजीपाल्यांचे दर खालीलप्रमाणे:

वांगे -  70 ते 80 रुपये किलो

हिरवी मिरची - 60 ते रुपये किलो

भेंडी - 60 ते 70 रुपये किलो

शेवगा - 70 ते 100 रुपये किलो

टोमॅटो - 30 ते 40 रुपये किलो

शिमला - 40 ते 50 रुपये किलो

फ्लॉवर - 30 ते 40 रुपये किलो

कोबी - 30 रुपये किलो

गिलके - 40 ते 50 रुपये किलो

कोथिंबीर - 20 रुपये जुडी

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: परळीचा निकाल घोषित करु नये- औरंगाबाद खंडापीठात याचिका

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT