अवकाळी पाऊसाचा रब्बी पिकांना फटका! पांढरा कांदा, भाजीपल्यासह आंबा बागायतदारही संकटात Saam Tv
ऍग्रो वन

अवकाळी पाऊसाचा रब्बी पिकांना फटका! पांढरा कांदा, भाजीपल्यासह आंबा बागायतदारही संकटात

अरबी समुद्रात तयार झालल्या कमी दाबाचा पट्ट्यामुळे रायगड जिल्ह्यात काल सकाळपासूनच पाऊस पडायला सुरूवात झाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : अरबी समुद्रात तयार झालल्या कमी दाबाचा पट्ट्यामुळे रायगड जिल्ह्यात काल सकाळपासूनच पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होते. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे. या अवकाळी पावसाचा गरव्या जातीचे भात, रब्बी हंगामातील कडधान्य, भाजीपला, पांढरा कांदा तसेच आंबा पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्याता आहे. त्याचबरोबर आंबा पिकावरही या नासाड्या पावसाचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने, जिल्ह्यातील शेतकरी आणि बागायतदार चिंतातूर झाले आहेत.

हे देखील पहा-

याचबरोबर मच्छीमारानाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. आज पाऊस थांबला असला, तरी ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील ३ दिवस कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्याता हवामान खात्याने वर्तवली होती. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत काल सकाळपासून रायगड जिल्ह्यात पाऊस पडण्यात सुरूवात झाली आहे. आणखी २ दिवस  पाऊस पडणार आहे.

रायगड जिल्ह्यात काही भागात गरव्या जातीच्या भाताची लागवड केली जाते. हा भात उशिरा पिकतो. त्यामुळे त्याची कापणी देखील उशिराने केली जाते. कापणी न केलेल्या गरव्या जातीच्या भातपिकाचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. रायगड जिल्ह्यात रब्बी हंगामात ४ हजार ५००  हेक्टर क्षेत्रावर कडधान्य व भाजीपाला लागवड केली जाते. अलिबाग तालुक्यात भात कापणी नंतर  पांढर्‍या कांद्याची लागवड केली जाते.

या पावसामुळे शेतात पाणी साचून राहीले आहे. तर त्यामुळे नुकतीच रूजून आलेली कडधान्य व भाजीपाल्याची रोपे कुजण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पांढर्‍या कांद्याच्या पिकाचे देखील काही प्रमाणात नुकसान होणार आहे. यामुळे यंदा कडधान्य, भाजीपाला व पांढर्‍या कांद्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT