Nalasopara : खाद्य तेलाची भेसळ करणाऱ्याला मनसेकडून चोप

खाद्य तेलाची भेसळ करणाऱ्या व्यक्तिला मनसेकडून चांगलाच चोप देण्यात आला
Nalasopara : खाद्य तेलाची भेसळ करणाऱ्याला मनसेकडून चोप
Nalasopara : खाद्य तेलाची भेसळ करणाऱ्याला मनसेकडून चोपSaam Tv

वसई : खाद्यतेल आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. यामध्ये जर भेसळयुक्त तेल असेल, तर मानवी आरोग्यावर त्याचे खूप वाईट परिणाम होत असतात. अशाच एका खाद्य तेलाची भेसळ करणाऱ्या व्यक्तिला मनसेकडून चांगलाच चोप देण्यात आला आहे. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी खाद्य तेलाची भेसळ करणाऱ्या व्यक्तिला चोप दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.अविनाश जाधव यांनी नालासोपारा फाटा येथील उमर कंम्पाउड या ठिकाणी एका अनधिकृत गाळ्यात भेसळयुक्त खाद्यतेलाच्या कारखान्याचा भांडाफोड केला आहे.

यावेळी एकाच तेलातून पामतेल, रिफाईन्ड तेल आणि झिरो कॅलेस्ट्रॉल असलेले सनफ्लावर तेल ही बनवले जात असल्याचे आढळून आले आहे. तेलाचे डबे खराब अवस्थेत होते. तेलाची टाकी देखील खराब अवस्थेत असलेले आढळून आले आहे. याविषयी तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्याला जाब विचारल्यावर त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने अविनाश जाधव यांनी त्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली आहे.

हे देखील पहा-

नागरीकांच्या आरोग्याशी खेळ चालवू नका, मात्र प्रशासनाचे यावर लक्षच नसल्याचा गंभीर आरोप जाधव यांनी यावेळी केला आहे. नागरिकांच्या जीवाशी कसा खेल चालू आहे. याचा भांडाफोड मनसेने उघड केला आहे. नालासोपारा फाटा येथील उमरकंम्पाउंड येथे एका गाळ्यात नागरिकांच्या आरोग्यास घातक खाद्य तेल बनवत असल्याचा भांडाफोड मनसेने उघड केला आहे. वसई विरार आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या गाळ्यावर धाड टाकली आहे. त्यांनी खाद्यतेलाची कशा प्रकारे भेसळ चालू आहे, हे निदर्शनास आणून दिले आहे.

Nalasopara : खाद्य तेलाची भेसळ करणाऱ्याला मनसेकडून चोप
ओमिक्रॉनचा अमेरिकेतही झाला शिरकाव; तब्बल 24 देशांना घातला विळखा

वसई विरार पालिका आणि अन्न व औषध प्रशासन यांची कोणतीही परवानगी न घेता खाद्य तेल बनवले जात होते. एकाच तेलातून पामतेल, रिफाईंड तेल आणि झिरो कॅलेस्ट्रॉल असलेले सनफ्लावर तेल ही बनवले जात होते. तेलाचे डबे खराब अवस्थेत होते. तेलाची टाकी ही खराब अवस्थेत होती. मनसेने याविषयी अन्न व औषध प्रशासनाला कळवूनही त्यांचा एकही अधिकारी कारवाईसाठी तेथे फिरकलाच नाही.

या उमर कंपाउंड आणि आजूबाजूला असे भेसळयुक्त खाद्यतेल बनविणारे १५ ते १६ कारखाने आहेत. मात्र, अशा कारखान्यावर ना अन्न व औषध प्रशासन ना पालिका प्रशासनाची नजर जात आहे. हे खाद्यतेल वसई विरार आणि आजूबाजूच्या परिसरात वेफर्स आणि फरसाण बनवण्यासाठी वापरले जात होते. यामुळे अशा खाद्यतेलामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे, असा आरोप जाधव यांनी यावेळी केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com