आवक वाढल्याने टोमॅटोची कवडीमोल दराने विक्री, बळीराजा हवालदील Saam Tv
ऍग्रो वन

आवक वाढल्याने टोमॅटोची कवडीमोल दराने विक्री, बळीराजा हवालदील

सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकरी टोमॅटो घेऊन येत आहेत.

विश्वभुषण लिमये

सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकरी टोमॅटो घेऊन येत आहेत. परंतु, टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने प्रति कॅरेटला 2 ते 3 रुपये भाव आला आहे. यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. शेतातून बाजारात घेऊन येण्यासाठी मालवाहतूकीचा खर्च देखील शेतकऱ्यांच्या हातात येत नाही.

टोमॅटो तोडणीसाठी लावलेल्या मजुरांची मजूरी देखील देण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. जगावे की मरावे असा प्रश्न त्यांसमोर निर्माण झाला आहे. सोलापूर मार्केट यार्डातील व्यापारी हे टोमॅटो गुजरात येथील अहमदाबाद, राजस्थान येथील जयपूर या ठिकाणी निर्यात करत आहेत. पण त्याठिकाणी देखील भाव गडगडले असल्याने, तेवढे भाव व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना मिळत नाही. व्यापाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही शेतकऱ्यांना सर्व माल खरेदी करत आहोत, त्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी पुर्ण प्रयत्न करत असल्याची माहिती दिली.

पण ज्या ठिकाणी टोमॅटो निर्यात केले जात आहे, त्या शहरातदेखील टोमॅटोचे भाव गडगडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कधी कोणते पीक आर्थिक लाभ मिळवून देईल तर कधी कोणते पीक डोळ्यात अश्रू आणेल हे सांगणे अवघड झाले आहे. शेती मालाला हमीभाव नसल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. टोमॅटोचे भाव गडगडले आहेत, कवडीमोल दराने भाव मिळत असल्याने टोमॅटोचे उभे पीक शेतातच पूरण्याची वेळ बळीराजावर आली आहे. दोन ते तीन रुपये प्रति कॅरेटला भाव मिळत असल्याने जाण्यायेण्याचा खर्च देखील शेतकऱ्यांना मिळत नाही.

मार्केट यार्डात दररोज 4 ते 5 हजार कॅरेट टोमॅटोची आवक होत असल्याने, कवडीमोल भाव मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी तर मार्केट यार्डात टोमॅटो विक्रीला आणलेही नाहीत. सोलापूर जिल्ह्यात यंदा टोमॅटो या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. यंदा टोमॅटोला योग्य भाव येईल, अशी आशा अनेक शेतकऱ्यांना होती. परंतु,शेतकऱ्यांच्या या आशेवर पूर्ण पाणी फिरले आहे. बाजारात या टोमॅटोची विक्री 2 ते 3 रुपये प्रति कॅरेट होत असल्याने, शेतकरी वर्ग चिंतेत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो बाजारात न विकता घराकडे परत येत असताना रस्त्याच्या कडेला हजारो टन टोमॅटो फेकून दिले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : पुण्यात API ला २,५०,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं, असा सापडला जाळ्यात

Smoking health risks: सिगारेट पिणाऱ्यांच्या आजूबाजूलाही फिरकू नका; वाढतो मृत्यूचा धोका

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

SCROLL FOR NEXT