Tomatoes Saam TV
ऍग्रो वन

लॉकडाऊनमध्ये खचलेल्या बळी राजाने टोमॅटो पिकातून घेतली उभारी...

सध्या टोमॅटोला बाजारात चांगला भाव मिळत असल्याने मावळ मधील टोमॅटो उत्पादन घेणारे शेतकरी उभारी घेऊ लागले आहेत.

दिलीप कांबळे

मावळ - लॉकडाऊन मुळे कंबरड मोडलेल्या शेतकरी राजा ने आता उभारी घ्यायला सुरुवात केली आहे. मावळ (Maval) मधील कालेगाव पवनानगर  येथील शेतकरी (Farmer) रोहिदास कालेकर यांनी दीड  एकर शेतात यशस्वी टोमॅटो चे पीक घेतले आहे. औषध आणि खता करीत दोन लाख रुपये खर्च आला. खर्च वजा करता दीड एकरात सुमारे साडेसहा लाखांचा निव्वळ नफा मिळवला आहे.

हे देखील पाहा -

सध्या टोमॅटोला बाजारात चांगला भाव मिळत असल्याने मावळ मधील टोमॅटो उत्पादन घेणारे शेतकरी उभारी घेऊ लागले आहेत. कालेकर यांनी दीड एकर मध्ये टोमॅटो पिकासाठी सुमारे पाच हजार रोपे लावली. त्यानंतर सरी तयार करून त्याला बांबू च्या साह्याने बईंडींग वायर बांधून आधार दिला. सरी तयार करीत असताना घरातील लोकांची मदत केली. त्यामुळे कामगारांना मजुरीची लागणाऱ्या पैशांची बचत झाली.

लॉकडाउन मध्ये शेतकरी राजाने टोमॅटो पीक घेतले परंतु संपूर्ण टोमॅटो बाजार बंद असल्याने फेकून द्यावे लागले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान मागच्या दोन वर्षात सोसावे लागले. परंतु आता बाजारात चांगली स्थिती निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा खचलेला शेतकरी राजा उभारी घेऊ लागला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT