Parbhani News Saam Tv
ऍग्रो वन

परभणीत ५ लाखांच्या सोयाबीनवर चोरट्यांचा डल्ला; १५० कट्टे लंपास

राजेश काटकर

परभणी - असोल्याच्या ओंकारेश्वर ट्रेडिंग कंपनीच्या भुसार दुकानमध्ये शनिवारी रात्री साडे आठ ते रविवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास दुकानाच्या पाठीमागील पत्रे वाकवून सुमारे ४ लाख ९५ हजार ५०० रुपये किंमतीचे १५० कट्टे सोयाबीन चोरून नेल्याची घटना परभणी तालुक्यातील आसोला पाटीजवळ घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात ताडकळस पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

हे देखील पाहा -

आसोला पाटीजवळील शेत शिवारातील शेत सर्व्हे नं. ५० मध्ये भरत हरिभाऊ भरोसे यांच्या जागेवर ओंकारेश्वर ट्रेडिंग कंपनी नावाचे भुसार दुकान आहे. शनिवारी रात्री साडे आठ ते रविवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे पाठीमागील पत्रे वाकवून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानाच्या पाच पैकी एका शटरचे आतून नटबोल्ट काढून, शटर उघडून दुकानातील सोयाबीनची चोरी केली. यात ५० किलो वजनाचे सोयाबीनचे १५० कट्टे चोरीला गेले असून त्यांचे वजन अंदाजे ७५ क्विंटल आहे.

सध्याच्या बाजार भावानुसार ६ हजार ५०० प्रति क्विंटल प्रमाणे ४ लाख ८७ हजार ५०० रुपयाचे व तसेच सीसीटीव्हीचा ८ हजार रुपये किंमतीचा डिव्हीआर अशा एकूण ४ लाख ९५ हजार ५०० रुपयांच्या मालावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी कैलास धोंडीराम भरोसे (रा.असोला) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ताडकळस पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४३७, ३८०, ४६२ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani News: 'सबका बदला लुंगा फिर लौटुंगा', चिठ्ठी लिहली अन् १२ वीतील मुलाने मृत्यूला कवटाळलं; परभणीत खळबळ

VIDEO: राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण

Marathi News Live Updates : मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

साउथ अभिनेत्याची मेहुणी गाजवणार Bigg Boss 18चं पर्व; केली धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हयचंय? फॉलो करा 'हा' गुरु मंत्र

SCROLL FOR NEXT