गावकऱ्यांनी साधला जलसंधारणातून आर्थिक विकास; 10 कोटीच्या अर्थकारणात बदल दीपक क्षीरसागर
ऍग्रो वन

गावकऱ्यांनी साधला जलसंधारणातून आर्थिक विकास; 10 कोटीच्या अर्थकारणात बदल

जिल्ह्यातील औसा तालुका तसा दुष्काळी सावली असलेला शिवली गावशिवारात पाण्याचे नेहमी दुर्भिक्ष होते

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातुर : जिल्ह्यातील औसा तालुका तसा दुष्काळी सावली असलेला शिवली गावशिवारात पाण्याचे नेहमी दुर्भिक्ष होते, पण राज्य शासन भारतीय जैन संघटना आणि ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून जलसंधारणाच ६ किलोमीटरच काम झाले आहे. पाण्याच्या संसाधनातून किमान 10 कोटीच्या अर्थकारणात बदल झाला आहे. शिवली गाव हे औसा तालुक्यातील भूकंपग्रस्त आणि दुष्काळग्रस्त भाग आहे. दरवर्षी पाण्याची टंचाई हा नेहमीचा विषय आहे. The villagers achieved economic development through water conservation

हे देखील पहा-

शेतीला पाणी नसल्याने या ठिकाणी शेतकऱ्यांनी जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन केले आहे. पण गेल्या काही वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्य शासन आणि भारतीय जैन संघटना आणि गावकऱ्यांनी एकत्रितपणे गावशिवारातील ओढे नाले याचे जवळपास ६ किलोमीटर इतकं ४० फूट रुंद १५ फूट खोल रुंदीकरण खोलीकरण केले याचा परिणाम शिवली आणि बिरवली या २ गावाच्या शिवारात पाण्याची पातळीत वाढ झाली आहे.

याचा परिणाम या शिवारात २ हजार एकर उसाच्या क्षेत्रात वाढ होऊन आता ६ हजार एकर क्षेत्र झाले, तर सोयाबीन आणि अन्य शेतमाल पिकांच्या उत्पादनात कमालीचा बदल झाला आहे. यापूर्वी गावात एकूण शेतमाल उत्पादनातून जवळपास ५ कोटी रुपयांच उत्पादन घेतले जात होते. आता तेच उत्पादन १० कोटीच्या घरात पोहचले आहे. दुष्काळाशी झगडणार शिवली गाव ग्रामस्थांच्या एकजुटीने आता समृद्ध झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan bhujbal : ऐन विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात पुन्हा जुंपली

Manoj Jarange News : आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा; जरांगेंचा नाव न घेता भुजबळांवर फटकेबाजी

Maharashtra News Live Updates: अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांच्या प्रचारात शिवसैनिकांची गर्दी

12th Student Suspended : युट्यूबवर पाहून बॉम्ब बनविला आणि थेट शिक्षकाच्या खुर्चीखाली केला विस्फोट, बारावीतल्या विद्यार्थ्यांचा कारनामा

Health Tips: धावपळीच्या जीवनात मन शांत आणि स्थिर ठेवायचे? फॉलो करा 'या' टिप्स

SCROLL FOR NEXT