SBI आणि MGB बँकेच्या घोळात गावकऱ्यांना अनुदान नाहीच; सरपंचाचा आंदोलनाचा इशारा दीपक क्षीरसागर
ऍग्रो वन

SBI आणि MGB बँकेच्या घोळात गावकऱ्यांना अनुदान नाहीच; सरपंचाचा आंदोलनाचा इशारा

औसा तालुक्यातील सर्वच गावांना अनुदान वितरित सुध्दा झाले, पण बेलकुंडसह लगतच्या गावातील अंदाजे 300 शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर: नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शासकीय अनुदान दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असं राज्य सरकारने स्पष्ट केले असताना अद्यापही लातुर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुंड येथील MGM बँकेत खाते असलेल्या लगतच्या गावातील किमान 300 शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही. तात्काळ अनुदान द्यावे अन्यथा आंदोलनाचा इशारा बेलकुंड गावचे सरपंच विष्णू कोळी यांनी दिला आहे. (The SBI and MGB bank scam does not provide grants to villagers; Sarpanch warning of agitation)

हे देखील पहा -

चालू वर्षी खरीप हंगामात सप्टेंबर महिन्याच्या अखेरिस अतिवृष्टी झाली. हाती आलेलं सोयाबीनचं मोठं नुकसान झाल्याने राज्य शासनाने हेक्टरी 10 हजार रुपयांचं अनुदान जाहीर केलं. दिवाळीच्या पूर्वी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं सांगितले असताना. लातुर जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी पंचनामे करून अहवाल सादर केला. औसा तालुक्यातील सर्वच गावांना अनुदान वितरित सुध्दा झाले, पण बेलकुंडसह लगतच्या गावातील अंदाजे 300 शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. औसा तालुक्यातील बेलकुंड गावात महाराष्ट्र ग्रामीण बँक असून या बँकेअंतर्गत लगतची हिप्परगा, कवळी, मालूनब्रा, चिंचोली, सोन, सिंदाळा आदी गावातील किमान 300 शेतकऱ्यांची MGB बँकेत खाते आहेत. औसा तहसील कार्यालयाने वेळीच बँकेत ज्या शेतकऱ्यांची खाते आहेत त्यांच्या अनुदानाचा धनादेश दिला होता पण दुर्दैवाने दोन वेळा हा धनादेश वटला नाही, यामुळे अद्यापही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित आहेत.

याबाबत बेलकुंड गावचे सरपंच विष्णू कोळी यांनी औसा तहसीलदार भरत सूर्यवंशी यांना भेटून याची कल्पना दिली आहे. तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना यावर तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी आर्थिक संकटात गेली आहे, संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय मदत द्यावी अन्यथा शेतकऱ्यासह तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा बेलकुंडचे सरपंच विष्णू कोळी यांनी दिला आहे. यावर तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होईल असं स्पष्ट केलं आहे

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT