मागणीत घट झाल्याने कांद्याचे बाजारभाव पडले... SaamTv
ऍग्रो वन

मागणीत घट झाल्याने कांद्याचे बाजारभाव पडले...

मागणीत घट झाल्याने 22 ते 27 रुपये प्रतिकिलोने विक्री होणारा कांदा 12 ते 17 रुपयांवर आला आहे.

रोहिदास गाडगे

चाकण : कोरोनाची तिसरी लाट येत असताना कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा संकटाच्या फे-यात अडकला आहे. साठवणुकीतील कांदा चाकण बाजारात विक्रीला आला आहे. मात्र, कांद्याचे बाजारभाव पुन्हा पडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. साधारणतः 22 ते 27 रुपये प्रतिकिलोने विक्री होणारा कांदा दर घटल्याने 12 ते 17 रुपयांवर आला आहे. The market price of onion fell due to reduced demand

हे देखील पहा -

कोरोना महामारीच्या संकट काळात मागील दोन वर्षापासुन हॉटेल, सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्याने कांद्याची मागणी घटलीय. योग्य बाजारभाव मिळेल या आशेने शेतक-यांनी कांद्याची साठवणुक केलीय आणि आता हाच साठवणुकीतील कांदा आता चाकण बाजारात मोठ्या प्रमाणात येत असताना कांद्याची मागणी घटल्याने 10 ते 12 रुपये प्रतिकिलोने कांदा विकावा लागत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. एकीकडे बाजारभाव घटले तर दुसरीकडे साठवणुकीतील कांदा सडत असून त्याच्या बाजारभावात पन्नास टक्क्यांनी घट होत आहे.

केंद्र सरकारच्या निर्यातीच्या धोरणांमध्ये धरसोड वृत्ती असल्याने निर्यातीसाठी आवश्‍यक असलेले अनुदान आणि निर्यातीसाठी प्रोत्साहन निधी केंद्र शासनाकडून वेळोवेळी मिळत नाही त्यामुळे त्याचा निर्यातीवर परिणाम होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या तुलनेने इतर देशांच्या निर्यात धोरणातील स्पष्टता योग्य असल्याने आपल्या देशात कांद्याची आयात होतेय.

त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेमध्ये होत आहे. सध्या शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा आता बाजारामध्ये आणण्याची वेळ आली आहे. कारण पुढील महिन्यापासून नवीन कांदा सुरू होणार आहे. त्यामुळे शेतकरी साठवणुकीतील कांदा बाहेर काढुन मिळेल त्या बाजारभावात विक्री करू लागले असून, सध्या कांद्याची मागणी घटल्याने बाजारभावही पडल्याचे चित्र आहे.

शेतक-यांच्या कुटुंबाचे आर्थिक गणित कांदा पिकावर अवलंबुन असते. मात्र मागील काही वर्षापासुन कांद्याच्या बाजारभावाच्या चढउतारामुळे शेतक-यांचे आर्थिक गणित दिवसेंदिवस कोलमडत चालले आहे. त्यामुळे सरकारने कांद्याचे बाजारभाव स्थिर ठेवण्यासाठी वेळीच योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navapur Vidhan Sabha : काँग्रेसचा गड असलेल्या नवापूर विधानसभेत तिरंगी लढत; अपक्ष उमेदवार शरद गावितांचे आव्हान

Maharashtra Election : शरद पवार खमक्या माणूस; महायुतीच्या स्टेजवरच रामदास आठवलेंकडून कौतुकवर्षाव

PM Narendra Modi : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठा भ्रष्टाचार; PM मोदींचा गंभीर आरोप

Ekta kapoor : घाबरून कधीच काम केलं नाही, मी हिंदू; एकता कपूर काय म्हणाली ?

कोणत्या देशात सर्वात जास्त भात खाल्ला जातो?

SCROLL FOR NEXT