सिद्धेश्वर धरणाचे दरवाजे उघडले; पूर्णा नदीपात्रात विसर्ग वाढला संदीप नागरे
ऍग्रो वन

सिद्धेश्वर धरणाचे दरवाजे उघडले; पूर्णा नदीपात्रात विसर्ग वाढला

जिल्ह्यातील इसापूर, सिद्धेश्वर धरणामध्ये येलदरी धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली : जिल्ह्यातील इसापूर, सिद्धेश्वर धरणामध्ये येलदरी धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे धरणातील पाण्यासाठ्यात वाढ झाल्याने गेट उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पूर्णा नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. पाण्याच्या आवक वाढत गेली तर सळणा येथील पूल पाण्याखाली येऊन नांदेड- औरंगाबाद हा महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे.

हे देखील पहा-

औंढा नागनाथ तालुक्यामधील सिद्धेश्वर धरणाची गेट उघडून ५०,००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात करण्यात येत आहे. या दरवाजे दहा फुटाने वर घेत पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे मातामाथा या ठिकाणील पुलाच्या खालोखाल नदीपात्रात पाणी वाहत आहे. पाण्याचा विसर्ग वाढत गेला, तर येथून जाणारा महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे. यामुळे जलसंपदा विभाग आणि पोलिस प्रशासनाच्या वतीने या रस्त्यावर जाणाऱ्या वाहनचालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

याचप्रमाणे पूर्णा नदी पात्रा शेजारील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात एकूण २५ गावांना देखील महसूल प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूर्णा नदी पात्रात पाणी पातळी वाढली असल्यामुळे गावातील छोट्या ओढ्यांमधील पाणी या पात्रात येण्यास अटकाव होत आहे. यामुळे ओढ्यांचे पाणी आजुबाजुच्या शेतामध्ये जाऊन तुंबले आहे. या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाची हानी झाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: राज्यात आणखी ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर, यादीत तुमचा तालुका आहे का? वाचा

आयटीआयमध्ये मिळणार पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याचे प्रशिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार

Jaw reconstruction surgery: जबड्याच्या कॅन्सरची गाठ काढल्यानंतर चेहरा विद्रूप होण्याची भीती सोडा! आधुनिक शस्त्रक्रियेमुळे पुन्हा मिळेल चेहऱ्याचा मूळ आकार

Maharashtra News Live Update: महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला अंगावर फेकली खुर्ची;युवासेना जिल्हाप्रमुखावर गुन्हा

Nail Cancer: नखांच्या कॅन्सरची सुरूवातीची लक्षणं कोणती? वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT