गिनीज बुकमध्ये नावलौकिक मिळवलेल्या गज्या बैलाचा मृत्यू... विजय पाटील
ऍग्रो वन

गिनीज बुकमध्ये नावलौकिक मिळवलेल्या गज्या बैलाचा मृत्यू...

जन्म बैलाचा पण देह हत्तीचा असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील गज्या बैलाने आज अखेरचा श्वास घेतला आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली - मालकाला कर्जमुक्त करणारा आणि महाराष्ट्रातील Maharashtra सर्वात मोठा बैल Bull म्हणून गिनीज बुकमध्ये Guinness Book नावलौकिक मिळवलेला आणि जन्म बैलाचा पण देह हत्तीचा असणाऱ्या सांगली Sangli जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील गज्या बैलाने आज अखेरचा श्वास घेतला आहे. The death of Gaja Bull form sangli

हे देखील पहा -

कृष्णा सायमोते आणि त्यांच्या कुटुंबियांनी सहा फूट उंच आणि दहा फूट लांब तसेच जवळपास एक टन वजन असलेल्या गज्याला आपल्या घरातील सदस्यांप्रमाणे वाढवले होते. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील कृषी प्रदर्शनात विशेष आकर्षण राहिलेल्या गज्याने आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. त्याच्या अवाढव्य शरीरयष्टी, देखणेपणा आणि वजनामुळे जन्म बैलाचा पण देह मात्र हत्तीचा असलेल्या गज्याला कृषी प्रदर्शनात मोठी मागणी असायची.

तसेच गजा बैलाने या माध्यमातून मालक सायमोते यांना कर्जमुक्त केले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्याला न विकता त्याचा शेवटपर्यत सांभाळ केला. हृदयविकाराच्या झटक्याने गजा बैलाचा मृत्यू झाला. कृष्णा सायमोते यांनी त्यांच्या घरच्या शेतात गज्यावर अंत्यसंस्कार केले आहेत. गज्याच्या अकाली जाण्याने कसबे डिग्रजसह तमाम बैलप्रेमींनी हळहळ व्यक्त केली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT