अजब घटना! न वेता आणि न गाभण राहता गाय देते चक्क 3 लिटर दूध दिपक क्षीरसागर
ऍग्रो वन

अजब घटना! न वेता आणि न गाभण राहता गाय देते चक्क 3 लिटर दूध

जनावरांवर दुधवाढीसाठी उपचार केले जातात. यामुळे शेतीला जोडव्यवसाय असेलेल्या दुग्ध व्यवसायात आमुलाग्र बदलही झाला आहे.

दिपक क्षीरसागर

लातूर: जनावरांवर दुधवाढीसाठी उपचार केले जातात. यामुळे शेतीला जोडव्यवसाय असेलेल्या दुग्ध व्यवसायात आमुलाग्र बदलही झाला आहे. यावर विविध संशोधनही होत असले तरी लातुर जिल्ह्यात समोर आलेल्या प्रकारामुळे पशुवैद्यक तज्ञही अवाक झालेत. 25 वर्षीय वयोवृध्द गाय आणि त्यात न वेता ती दुध देत आहे हे ऐकून तुम्हाला धक्का बसला आहे.

काळाच्या ओघात शेती व्यवसाय बदलत आहे अनेक नविन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे त्याच्या साहय्याने जनावरांच्या लहान-मोठ्या आजारांपासून ते दुधवाढीपर्यंतच्या गोष्टींवर उपचार केले जातात. यामुळे शेतीच्या जोडव्यवसयात आमुलाग्र बदलही झाला आहे. पशुवैद्यकीय क्षेत्रात अनेक संशोधनही होत असले तरी लातुर जिल्ह्यात औसा तालुक्यातील हिप्परसोगा इथं असाच आश्चर्य चकित करणारा प्रकार समोर आला आहे, यामुळे पशुवैद्यकीय तज्ञही अवाक् झालेत. एकतर 25 वर्ष वयोवृध्द गाय आणि त्यात न वेता ती दुध देत आहे. लातुर जिल्ह्यातील औसा तालु्क्यातील हिप्परसोगा गावचे बालाजी संभाजी सोमवंशी यांना बागायत आणि जिरायत अशी मिळून 8 एकर जमिन आहे.

शेतकरी संघटनेचे जुने कार्यकर्ते बालाजी सोमवंशी हे शेती सोबतच दुग्ध व्यवसायही करतात. त्यांच्याकडे 25 वर्षांची ‘जानी’ नावाची गाय आहे. या गाईमुळेच सोमवंशी कुटूंबीयांच्या दुग्ध व्यवसायाला उभारी मिळालेली होती. आतापर्यंत पाच वेतं झालेल्या ‘जानी’नं प्रत्येक वेतानंतर 7 महिने तेही 3 लीटर (एका वेळी) दुध दिलं. अनोळखी जर कोण धार काढण्यास बसले तर जानी जमू देत नव्हती. पण ओळखिच्या कोणालाही धार काढून द्यायची. पाच वर्षापूर्वी ही गाय माजावर आल्याने डॅाक्टरांकडून काय ते उपचार केले गेले पण गाय गाभण राहीली नव्हती. डॅाक्टरांना याबाबत विचाराल्या नंतर या गाईचे वय झाल्याने आता ही गाभण राहणार नाही असे सांगितले होते. परंतु, पाच महिन्यांपुर्वी अचानक गाय कास करू लागली. शेवटच्या तीन महिन्यात तर जास्तच कास धरल्याने बालाजी यांना आश्चर्य वाटले.

तपासणी केली असता. गाय गाभण नाही पण सडात दुध साठले असल्याचे डॅाक्टरांकडून सांगिण्यात आले. एके दिवशी सोमवंशी यांनी गायच्या पाय़ात दोरी बांधून धार काढली. पहिल्या दिवशी एक कप जानीनं दिलं. दुसऱ्या दिवशी एक ग्लास असे दुध दिवसेंदिवस दुध देण्याची पातळी वाढत गेली. आता गेली चार महिन्यापासून न वेता ही गाय दिवसाकाठी 3 लीटर दुध देत आहे. नक्की हा निसर्गाचा चमत्कार आहे का? की पशुवैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला मोठं आव्हान हे न उलगडणार कोड असा प्रश्न गावातील तरुण शेतकऱयांना पडला आहे.

प्राण्यांत सस्तन प्राण्याला दूध येण्यासाठी पिल्लांना जन्म देणे आवश्यक असते यावेळी हार्मोन्समध्ये बदल होऊन दूध येण्याची घटना घडत असते पण काही संप्रेरके वापरून दूध निर्मिती करण्यासाठी प्रयोग झाले आहेत पण ही घटना अत्यंत दुर्मिळ आहे नेमकं या प्रकारात काय झाले हे पाहणे गरजेचे ठरनार असल्याचं मत जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ राजकुमार पडिले याचं मत आहे. या अजब प्रकाराची माहिती बालाजी सोमवंशी यांना पशुवैद्यकीय क्षेत्रतील तज्ञांना देखील दिलेली आहे. मात्र, याबाबत कुणाला काहीही सांगता आलेलं नाही. त्यामुळे यावर संशोधन होणं हे मोठं आव्हान असणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai : गटाराच्या पाण्यात महिलेने धुतली भाजी, नवी मुंबईतील प्रकार; किळसवाणा Video Viral

Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

Maharashtra Rain Live News : - सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; कल्याण- डोंबिवलीतील सखल भागात पाणी, जनजीवन विस्कळीत PHOTO

Solapur Shocking: माझ्या अंगावर गाडी का घातली? बस थांबवत पैलवानानं एसटी चालकाची गचांडी पकडली | Video Viral

SCROLL FOR NEXT