निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

Fact Check: मुख्य निवडणूक आयुक्त अमित शाहांच्या पाया पडल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय...या व्हिडिओ ज्ञानेश कुमार हे शाहांच्या पाया पडत असल्याचं दिसतंय...पण, खरंच व्हिडिओत दिसतंय ते खरं आहे का...?
AI-edited viral video falsely claims that CEC Gyanesh Kumar touched Amit Shah’s feet. Fact-check reveals the clip is manipulated.
AI-edited viral video falsely claims that CEC Gyanesh Kumar touched Amit Shah’s feet. Fact-check reveals the clip is manipulated.Saam Tv
Published On

.या व्हिडिओत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे अमित शाहांच्या पाया पडताना दिसतायत...हा व्हिडिओ आता व्हायरल होत असून, बघा, कसे निवडणूक आयुक्त अमित शाहांच्या पाया पडत आहेत असा दावा करण्यात आलाय...पण, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तथ्य आहे का...? खरंच निवडणूक आयुक्त शाहांच्या पाया पडलेत का...? सध्या देशभरात व्होटचोरीचा मुद्दा गाजतोय...यावरून विरोधकांनी रान पेटवलंय...आणि हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केला जातोय...त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली...

हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली...हा विषय गंभीर आहे...त्यामुळे आम्ही या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी व्हिडिओ निरखून पाहिला...व्हिडिओ जवळून पाहिल्यास काही विसंगती दिसून आली...जेव्हा ज्ञानेश कुमार अमित शहांना शाल घालतात तेव्हा ती शाल शाहांच्या खांद्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या त्यांच्या हातावर पडते...त्यानंतर भेटवस्तू आणि सन्मानचिन्ह देऊन शाहांचा गौरव करण्यात आल्याचं दिसतंय...

आता हा मूळ व्हिडिओ पाहा...यामध्ये शाहांना शाल घातल्यानंतर ज्ञानेश कुमार बाजूला होतात...मात्र, ते शाहांच्या पाया पडताना दाखवण्यात आलंय...

निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार शाहांच्या पाया पडलेले नाहीत

व्हायरल व्हिडिओ एआय-जनरेटेड

आयुक्त होण्यापूर्वी ज्ञानेशकुमार शाहांसोबत एकाच कार्यक्रमात होते

ज्ञानेशकुमार शाहांना शाल घालतानाच्या व्हिडिओत छेडछाड

सध्या निवडणुका आहेत...आणि व्होटचोरीचा मुद्दा गाजत असल्याने असे व्हिडिओ व्हायरल केले जातात...आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली त्यावेळी मुख्य निवडणूक आय़ुक्त ज्ञानेशकुमार शाहांच्या पाया पडले हा दावा असत्य ठरलाय...असे व्हिडिओ तुमच्याकडे आल्यास व्हायरल करू नका...कारण, असे व्हिडिओ दिशाभूल करण्यासाठी शेअर केले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com