Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

Sangli Accident update : सांगलीत एसटी बसचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात ट्रॅक्टरने धडक दिल्याने एसटी बस ओढापात्रात कोसळली.
Sangli news
Sangli Accident Saam tv
Published On
Summary

राज्यात अपघाताची मालिका सुरु

नाशिकनंतर सांगलीत एसटी बसचा अपघात

एसटी बस थेट ओढापात्रात कोसळली

महाराष्ट्रात एसटी बसच्या अपघाताच्या मालिका सुरु आहे. नाशिकच्या सिन्नर बस स्थानकातील एसटी बसच्या अपघाताची घटना ताजी असताना सांगलीतूनही अपघाताची घटना समोर आली आहे. सांगलीच्या आरग शिंदेवाडी रस्त्यावर एसटी बस आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला. या अपघातात ४० हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या मिरज बस आगारातून आरग शिंदेवाडी मार्गे कर्नाटकातील मदभावीकडे जाणाऱ्या एसटी बसला उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने समोरासमोर जोरदार धडक दिली. शिंदेवाडी गावाबाहेरील ओढापत्रात एसटी बस कोसळली. यामध्ये ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले. घटनेनंतर मिरज आगाराच्या एसटी बस अधिकारी आणि पोलिसांनी घटनेसाठी धाव घेतली.परंतु यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Sangli news
Local Body Elections : मतदानाआधीच उधळला विजयी गुलाल! मलकापूरमध्ये भाजपचे एकाच वेळी ५ उमेदवार बिनविरोध

मिरज आगारातून एसटी बस दुपारी तीनच्या दरम्यान शिंदेवाडी गावाकडे जात होती.ऊसाच्या कांड्यांनी दोन ट्रॉली भरलेला ट्रॅक्टर तीव्र वळणावरून आरगेच्या दिशेने जात होता. गावाशेजारील ओढापत्रालगत असणाऱ्या तीव्र वळणावरती एसटी बस आणि ट्रॅक्टरची समोरासमोर जोरदार धडक बसली.

अपघातात एसटी बसचा मागील भाग ओढापात्रात गेला. तर ट्रॅक्टरचे इंजिन रस्त्याकडेला असणाऱ्या झुडपात शिरले आणि ऊस कांड्यानी भरलेली ट्रॉली रस्त्यावरच उलटली. या अपघातात शालेय विद्यार्थ्यांसह एकूण ४० प्रवासी जखमी झाले. बसचालक गंभीर जखमी झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली.

Sangli news
कोल्हापुरात राजकारण फिरलं, हसन मुश्रीफ-समरजीत सिंह घाटगेंची युती; कट्टर विरोधक एकत्र कसे आले? VIDEO

अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले. जखमींना मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये एसटी बस व उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे.पोलीस घटनेचा पंचनामा करून पुढील तपास करीत आहेत.

Sangli news
कुख्याला लॉरेन्स बिश्र्नोईच्या भावाला मुसक्या बांधून भारतात आणलं; अनमोल बाबा सिद्दिकी हत्याकांडातील आरोपी

नाशिकच्या सिन्नर बस स्थानकातही अपघात

नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात मोठी खळबळजनक घटना घडली. स्थानकात येत असलेल्या बसचे अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे बस थेट प्रवासाच्या अंगावर गेल्याने यात एका लहान मृत्यू झाला. तर 3 ते 4 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com