माध्यम बदललं.वेळ बदलली.. सगळं काही डिजीटल झालं आणि आपल्यातलाच सूरज चव्हाण स्टार झाला. सोशल मिडीयावर कमाल करणाऱ्या सूरज चव्हाणला जे बक्षीस मिळालं ते राजाश्रयाहून कमी नाही बरं का! सूरजसोबत जुन्या गर्लफ्रेंडने गुलीगत धोका दिला असला तरी अजित दादांनी वादा कायम ठेवला. नशीबाने साथ दिली आणि सूरजचं लग्नही ठरलं आणि नव्या घरात प्रवेशही झाला. मात्र या आनंदात सूरज आपल्या अजित दादांचे आभार मानायला विसरला नाही. सूरजने सोशल मिडीया प्लॅटफॉर्म इंन्स्टाग्रामवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार मानलेत
आज केला माझ्या नवीन घराचा गृह प्रवेश. आदरणीय अजितदादा पवार फक्त तुमच्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य तरुणाला हक्काचे घर मिळाले. आपण नेहमी माझ्यासारख्या गोरगरीबाच्या मदतीला येता, यापुढे देखील असेच अनेकांच्या मदतीस याल अशी मला खात्री आहे.
घरातली साधी माणसं, पत्र्याचं घर आणि गरीबी... या स्थितीत सोशल मिडीयावर 'गुलीगत' असा नावलौकीक मिळवणारा सूरज चव्हाण... आज लाखपती झालाय.. . इन्स्टाग्रामवरचे स्वत:च्या मोबाईलमध्ये शूट केलेल व्हिडीओज ते बिग बॉसची ट्रॉफी... सूरजचा प्रवास जिद्दीची दखल देतो. बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केल्यानंतर तो केवळ एक स्पर्धक राहीला नाही तर; तो घराघरात पोहोचणारा, लोकांच्या मनात बसणारा चेहरा बनला. बिग बॉसची ट्रॉफी मिळाल्यानंतर सूरजचं आयुष्य पूर्णत: बदललं. ही ट्रॉफी जिंकताच अजित पवारांनी त्याला घर बांधून देण्याचा शब्द दिला आणि त्यांनी तो पूर्ण केला. आर्थिक सुबत्ता , करिअरच्या नव्या वाटा आणि चाहत्यांचा अपार पाठिंबा हे सगळंच सूरजसाठी होतं. आई वडीलांचं छत्र हरवलेलं असलं तरी अजित पवारांच्या माध्यमातून त्याला हक्काचं छत मिळालंय.
सूरज चव्हाणचं नवं घर एखाद्या आलीशान महालापेक्षा कमी नाही. सर्व अद्ययावत सुख-सुविधांनी सज्ज असलेल्या नव्या घरात प्रत्येक गोष्टी आहेत ज्याची सामान्यांना इच्छा असते. हे आकर्षक इंटिरियर पाहून तुमचेही डोळे चमकतील. एवढंच काय तर त्याने काही दिवसांपूर्वीच त्याच्या होणाऱ्या बायकोचा चेहरा देखील चाहत्यांना दाखवला आहे. असो सोशल मिडीयावर नशीब आजमावणाऱ्यांचं पीक आहे... पण याचं सोनं करुन पाय जमिनीवर ठेवणं फार कमी लोकांना जमतं.सूरज ही त्यातलाच एक.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.