Tomatoes, swabhimani shetkari sanghtana, tomato, tomato price Saam Tv
ऍग्रो वन

Tomato Farmers Angry: शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे पडताहेत तर तुमचं का दुखते? टाेमॅटाेच्या दरावरुन शेतकरी नेते संतप्त

Swabhimani Shetkari Sanghatana On Tomato Prices : शेतक-यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik News : टाेमॅटाेच्या दर वाढीवर केंद्र सरकराने तातडीने नाफेडच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत स्वस्त दरात पाेहचविण्याचा घेतलेला निर्णय याेग्य नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप (Sandeep Jagtap Swabhimani Shetkari Sanghatana) यांनी नमूद केले. मतदार डाेळ्यासमाेर ठेवून शेतक-याला मारण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचे जगताप यांनी नमूद केले. (Maharashtra News)

टोमॅटोचे दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्राकडून करण्यात आलेल्या हस्तक्षेपामुळे शेतकरी नेते संताप व्यक्त करु लागले आहे. केंद्राचं धोरण शेतकऱ्यांना मारक ठरणारे आहे अशी शेतकरी नेत्यांनी टाेमॅटाेच्या दरावरुन घेतलेल्या निर्णयावर टीका केली.

तेव्हा सरकार झाेपले हाेते

संदीप जगताप (प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना) म्हणाले महिनाभरापूर्वी टोमॅटोला कवडीमोल दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यावे लागले. त्यावेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हस्तक्षेप का केला नाही? असा सवाल जगताप यांनी केला.

आता कुठे शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे पडत असतानाच केंद्राने हस्तक्षेप केल्यानं शेतकरी पुन्हा वाऱ्यावर साेडणार असेच दिसत आहे. साेयाबीन, कपाशी, ऊसचा एफआरपी दर याबाबत सरकार लक्ष देत नाही असेही जगताप यांनी नमूद केले.

केंद्राचा निषेध

दरम्यान किसान सभेचे नेते डाॅ. अजित नवले म्हणाले टोमॅटोचे दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्राकडून देशभरात ५०० आऊटलेट्स सुरू केले जाणार आहेत. या निर्णयाचा आम्ही निषेध नाेंदविताे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ: 'अरे याला तर हिंदी येतं...', रिषभ- वॉशिंग्टनचा मजेशीर संवादाचा VIDEO व्हायरल

Ahilyanagar Crime: दुहेरी हत्याकांडातील आरोपीची शाही मिरवणूक! हत्या केलेल्यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी, नगरमधील घटना

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT